Aditi Tatkare : लाडकी बहीण योजनेचा हप्ता अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर जमा होणार; मंत्री आदिती तटकरेंनी केली घोषणा

मुंबई : राज्यात सर्वात लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. विशेष म्हणजे यंदा लाभार्थींची संख्या घटणार की वाढणार असा प्रश्न उपस्थित होत असतानाच आता एप्रिलचा हप्ता जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारच्या वतीने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित करण्यात आली होती. मात्र निवडणुकीच्या काळात महिलांना 2100 रुपये या योजनेच्या माध्यमातून देण्याचे आश्वासन महायुती कडून अद्याप पूर्ण करण्यात आलेले नाही. असे असले तरी दरमहा पंधराशे रुपयांचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होत आहे.
एप्रिल महिन्याचे पैसे देखील आता महिलांच्या खात्यात जमा होणार असून अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर हे पैसे महिलांच्या खात्यात जमा होतील, असे आदिती तटकरे यांनी म्हटले आहे.





