Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी अखेरची संधी! e-KYC मधील चूक दुरुस्त करा, शेवटची तारीख काय?
Ladki Bahin Yojana : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे.

Ladki Bahin Yojana : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे.
e-KYC प्रक्रिया करताना तांत्रिक कारणांमुळे किंवा नजरचुकीने चुकीची माहिती भरलेल्या महिलांना आता अर्ज दुरुस्तीची एकमेव आणि अंतिम संधी देण्यात आली आहे.
e-KYC मध्ये नेमकी काय चूक झाली?
योजनेंतर्गत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत लाखो महिलांनी e-KYC प्रक्रिया पूर्ण केली होती. मात्र, कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी आहेत का? किंवा निवृत्तीवेतन (Pension) घेतात का? या पर्यायात अनेक लाभार्थ्यांकडून चुकीची नोंद झाली. परिणामी, पात्र असूनही अनेक महिलांचे अर्ज अपात्र ठरण्याच्या मार्गावर होते.
जिल्हाधिकारी स्तरावर या अर्जांची पडताळणी सुरू असली, तरी प्रक्रिया सुलभ व जलद व्हावी यासाठी शासनाने आता ऑनलाईन दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
३१ मार्च २०२६ ही अंतिम मुदत
ज्या महिलांच्या अर्जात ‘कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत आहे किंवा निवृत्तीवेतनधारक आहे’ या बाबतीत चूक झाली आहे, त्या महिलांना ३१ मार्च २०२६ पर्यंत अधिकृत पोर्टलवर जाऊन e-KYC मधील माहिती दुरुस्त करता येणार आहे.
शासनाचे स्पष्ट आदेश
ही सुधारणा करण्याची ही शेवटची संधी असून, यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, असे शासनाने स्पष्ट केले आहे. यासाठी पोर्टलवर आवश्यक तांत्रिक बदलही करण्यात आले आहेत.
अधिक माहितीसाठी लाभार्थींनी www.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर (सांकेतांक : 202602061212231330) भेट द्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.





