Ladki Bahin Yojana : रक्षाबंधननिमित्त लाडक्या बहिणींना मिळणार खास भेट; खात्यात जमा होणार 1500 रुपये
Ladki Bahin Yojana: सामाजिक न्याय विभागाचा ३४४.७४ कोटी रुपयांचा निधी पुन्हा लाडकी बहिणीकडे वळवला

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण अंतर्गत पात्र महिलांना रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर जुलै महिन्याचा १५०० रुपयांचा थकीत हप्ता खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
महायुती सरकारने या हप्त्याच्या वितरणासाठी मोठा निर्णय घेत सामाजिक न्याय विभागाकडून तब्बल ३४४.७४ कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वळवला आहे. सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला.
निधी वर्ग झाल्यामुळे आता पुढील ४८ तासांत पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सणासुदीच्या दिवसांत राज्यातील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, सोमवारी निधी वळवल्यामुळे आता पुढील दोन दिवसांत थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रक्रिया वेगाने पूर्ण केली जाईल.
१ कोटी ६५ लाख पात्र लाभार्थी महिला
राज्यभरातील सुमारे १ कोटी ६५ लाख पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात हा जुलै महिन्याचा हप्ता जमा होणार आहे. मात्र, दुसरीकडे कागदपत्रांची अपूर्तता किंवा निकषांत न बसल्यामुळे जवळपास ९० लाख महिलांचा लाभ बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून या योजनेसाठी सातत्याने सामाजिक न्याय विभाग तसेच आदिवासी विकास विभागाचा कोटींचा निधी वळवला जात आहे. त्याचा परिणाम या दोन्ही विभागांच्या इतर योजनांवर जाणवू लागला आहे.
आतापर्यंत किती वेळा निधी वळवला ?
यापूर्वी फेब्रुवारी 2026 मध्ये, जानेवारीच्या हप्त्यासाठी 98.45 कोटी रुपये हे वळते करण्यात आले होते. तर जून 2025 मध्ये एप्रिल आणि मे महिन्याच्या मानधनासाठी 410 कोटी रुपये हे वळवण्यात आले. ऑगस्ट ते ऑक्टोबर 2025 आणि जुलै आणि सप्टेंबरच्या हप्त्यांच्या वितरणासाठी 410 कोटी रुपये हे लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आले होते. आता चौथ्यांदा लाडकी बहीण योजनेसाठी 344 कोटी वळते करण्यात आले आहेत.
दरम्यान, सतत निधी वळवला जात असल्याने, सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागाच्या इतर कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीवर याचा अधिक परिणाम होऊ शकतो.
हेही वाचा:






