तुम्हाला मिळाले का पैसे? ! लाडक्या बहिणींना जानेवारीचे पैसे मिळण्यास सुरुवात ; पहिल्याच दिवशी ‘इतक्या’ बहिणींच्या खात्यात रक्कम जमा?

Ladki Bahin Yojana । महायुतीची महत्वकांक्षी योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या जानेवारीच्या हप्त्याचे पैसे आता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. याविषयी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जानेवारीच्या हप्त्याची रक्कम लाभार्थी महिलांच्या खात्यात वर्ग करण्यास सुरुवात केल्याची माहिती दिली आहे.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या जानेवारीच्या म्हणजेच सातव्या हप्त्याची रक्कम लाभार्थी महिलांच्या खात्यात येण्यास सुरुवात झाली आहे. आदिती तटकरे यांनी यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार, ‘लाडक्या बहिणींच्या खात्यात 26 जानेवारीपूर्वी रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी 1 कोटी 10 लाख महिलांच्या खात्यात रक्कम जमा झाली”अशी माहिती तटकरे यांनी दिली.
पहिल्या दिवशी 1 कोटी 10 लाख महिला लाभार्थी Ladki Bahin Yojana ।
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जानेवारी 2025 महिन्याचा सन्मान निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती दिली. 24 जानेवारी म्हणजेच पहिल्या दिवशी 1 कोटी 10 लाख लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा झाला असल्याची माहिती आदिती तटकरेंनी दिली. 26 जानेवारी पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा होणार आहे.
आतापर्यंत 10500 रुपये जमा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला जुलै 2024 पासून सुरुवात करण्यात आली होती. या योजनेद्वारे जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची रक्कम ऑगस्ट महिन्यात एकाच वेळी महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती. जानेवारीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 7 हप्त्यांची रक्कम लाभार्थी महिलांना मिळेल. म्हणजेच एका लाभार्थी महिलेला 10500 रुपयांची रक्कम मिळालेली आहे.
2100 रुपयांचा निर्णय अर्थसंकल्पानंतर Ladki Bahin Yojana ।
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवू असे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिला होते. महायुतीच्या नेत्यांनी त्यांचे सरकार आल्यास महिलांच्या खात्यात दरमहा 2100 रुपये देऊ असे आश्वासन दिले होते. त्यानुसार लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार असा प्रश्न विरोधकांकडून करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पानंतर त्याबाबत निर्णय होईल, असे सांगितले होते.
डिसेंबर महिन्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या खात्यात 24 डिसेंबरला रक्कम वर्ग करण्यात आली होती. आता देखील लाडक्या बहिणींच्या खात्यात 24 जानेवारीला रक्कम वर्ग करण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यात 2 कोटी 52 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्कम वर्ग करण्यात आली होती.





