Ladki Bahin Yojna : ‘लाडकी बहिणीचा सहावा हप्ता डिसेंबरमध्ये’ – आदिती तटकरे
Updated On:

Ladki Bahin Yojna – लाडक्या बहिणीचा सहावा हप्ता डिसेंबरमध्ये देण्यात येणार असल्याचा खुलासा महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी एक्सवर ट्विट करून केला आहे.
विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर निवडणूक आयोगाकडून मतदारांवर थेट प्रभाव टाकणा-या आर्थिक योजना बंद करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाकडून देण्यात आल्या आहेत.
त्यानंतर महायुतीची महत्वाकांक्षी योजना असलेली लाडकी बहीण योजनेला सुद्धा तात्पुरता ब्रेक लागला आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजना बंद झाल्याची चर्चा रंगली. मात्र, आता आदिती तटकरे यांनी स्वतः खुलासा केला आहे.





