‘त्या’ स्पर्धेत सहभागी फुटबॉलपटूंना देशाकडून खेळण्यावरही निर्बंध
Updated On:

लंडन – फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता फेरीतील सामन्यांना लवकरच सुरुवात होणार आहे. मात्र, सध्या ला लीगा व इंग्लिश प्रीमिअर लीग स्पर्धा सुरू आहेत. त्यात अनेक देशांचे प्रसिद्ध व अव्वल फुटबॉलपटू सहभागी झालेले आहेत. त्यांना विश्वकरंडक पात्रता स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी या स्पर्धांतील संयोजकांनी नाकारली आहे.
या स्पर्धेत संघांची बाजू कमकुवत होईल या भीतीने अनेक क्लबनी आपल्या संघातील स्टार खेळाडूंना मनाई केली आहे. आपापल्या देशाकडून खेळण्यासाठी ला लीगा पाठोपाठ इंग्लिश प्रीमियर लीगमधील संघांनीही खेळाडूंना परवानगी नाकारली आहे. कतारमध्ये पुढील वर्षी फुटबॉल विश्वकरंडक स्पर्धा होणार आहे.




