‘क्योंकि सास भी कभी बहू थी 2’ प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज; स्मृती इराणी यांची होणार धमाकेदार एन्ट्री

Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2 Promo | ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या हिंदी मालिकेला मोठी लोकप्रियता मिळाली होती. केंद्रीय मंत्री आणि अभिनेत्री स्मृती इराणी यांना याच मालिकेमुळे घराघरांत ओळख मिळाली होती. यात त्यांनी ‘तुलसी विरानी’ ही भूमिका साकारली होती.
काही दिवसांपूर्वीच निर्माती एकता कपूरने ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या गाजलेल्या मालिकेच्या दुसऱ्या भागाची घोषणा केली होती. त्यानंतर या मालिकेच्या दुसऱ्या सीझनचा प्रोमो इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक कुटुंब हॉटेलमध्ये ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ मालिकेची चर्चा करताना दिसत आहे. त्यानंतर स्मृती इराणी यांची धमाकेदार एन्ट्री होते. त्या म्हणतात की, “मी पुन्हा आले आहे. प्रेक्षकांसोबत माझे 25 वर्षांपासून घट्ट नातं आहे.” ‘क्योंकि सास भी कभी बहू थी 2’ चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. प्रेक्षकही मालिका पाहण्यासाठी खूप आतुर झाले आहे. Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2 Promo |
View this post on Instagram
‘क्योंकि सास भी कभी बहू थी २’ ही मालिका २९ जुलैपासून ‘स्टार प्लस’ वाहिनीवर रात्री १०.३० वाजता प्रसारित केली जाणार आहे. याशिवाय जिओ हॉटस्टारवर देखील मालिका पाहता येणार आहे. ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ 2000 साली प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेने 2008ला प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता 25 वर्षानंतर तुलसी प्रेक्षकांना भेटायला येणार आहे. Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2 Promo |
हेही वाचा:
तामिळनाडूत रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या स्कूल बसला रेल्वेची धडक ; दोन मुलांचा दुर्दैवी अंत

