‘क्योंकी सास भी कभी बहू थी’चा दुसरा भाग येणार; मुख्य भूमिकेत कोण दिसणार?

Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2 | ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. यातील स्मृती इराणी यांच्या तुलसीच्या भूमिकेला अनेकांची पसंती मिळाली. या मालिकेचा मोठा चाहता वर्ग आहे. लवकरच या मालिकेचा सीझन 2 येणार आहे.
एका वृत्तानुसार, एकता कपूरचा ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा दुसरा सीझन 150 भागांचा असेल. यामागील कारण स्पष्ट करताना एकता म्हणाली की, जेव्हा मूळ टीव्ही शो संपला, त्यावेळी 2000 एपिसोड पूर्ण होण्यासाठी 150 भाग शिल्लक होते. त्यामुळे आता ते 150 पूर्ण होणार आहेत. 2000 एपिसोड्सचा टप्पा गाठणे हा मालिकेचा हक्क आहे. दरम्यान, या मालिकेचा टीआरपी देखील कायम टॉपवर राहीला होता.
एकता कपूरने स्मृती इराणी तुलसीच्या भूमिकेत पुन्हा पाहायला मिळतील अशी हिंट देखील दिली आहे. ती म्हणाली की, “या मालिकेत एक राजकारणी देखील असेल” मीडिया रिपोर्टनुसार, ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ सीझन दोनमध्ये ‘मिहिर विरानी’च्या भूमिकेसाठी अमर उपाध्याय, हितेन तेजवानी आणि रोनित रॉय यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. मात्र अद्याप एकता कपूरने याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2 |
हेही वाचा:





