चंदीगड-पंजाब : आम आदमी पक्षाने अमृतसर उत्तरचे आमदार आणि माजी आयपीएस अधिकारी कुंवर विजय प्रताप सिंह यांना ५ वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले आहे. कुंवर विजय प्रताप यांच्या पक्षविरोधी कारवाया आणि पंजाब सरकारच्या ड्रग्जविरुद्धच्या मोहिमेत अडथळा आणल्याच्या आरोपांमुळे पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीने हे कठोर पाऊल उचलले आहे. कुंवर विजय प्रताप सिंह हे माजी आयपीएस अधिकारी आहेत. ते कोटकपुरा आणि बेहबल कलान प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एसआयटीचे प्रमुख आहेत. आयजी कुंवर विजय प्रताप सिंह आपल्या राजीनाम्यावर ठाम आहेत. अलीकडेच, कुंवर विजय प्रताप यांनी शिरोमणी अकाली दलाचे वरिष्ठ नेते बिक्रम सिंह मजिठिया यांच्या दक्षता कारवाई आणि अटकेवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी सार्वजनिक व्यासपीठांवर मजिठिया यांच्या पत्नीशी दक्षता पथकाच्या वादाचा व्हिडिओ शेअर केला होता आणि सरकारची कारवाई अन्याय्यकारकअसल्याचे म्हटले होते. त्यांनी म्हटले होते की, मजिठिया तुरुंगात असताना पंजाब सरकारने कोणतीही चौकशी केली नाही आणि त्यांच्या जामिनात मदत केली नाही, परंतु आता अचानक कारवाई सुरू केल्याने प्रश्न उपस्थित होतात. आपने हे विधान त्यांच्या विचारसरणी आणि ड्रग्जविरुद्धच्या मोहिमेविरुद्ध असल्याचे मानले. काय आहे प्रकरण ? शिरोमणी अकाली दलाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बिक्रम सिंह मजिठिया यांना २५ जून रोजी पंजाब दक्षता ब्युरोने अमृतसर येथील त्यांच्या घरातून अटक केली होती. मजिठिया यांच्यावर ५४० कोटींहून अधिक रुपयांच्या ड्रग्ज मनी लाँड्रिंगमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे. मजिठिया यांना मोहाली न्यायालयाने ७ दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठवले आहे. आता त्यांना २ जुलै रोजी हजर केले जाईल.