कुणाल कामराचं ओपन चॅलेंज.! सांगितलं पुढच्या कार्यक्रमाचं ठिकाण, काय म्हणाला एकदा पाहाच….

Kunal Kamra | कॉमेडियन कुणाल कामरा त्याच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा नव्या वादात अडकला आहे. कॉमेडी शोमध्ये एका गाण्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षरित्या केलेल्या टिप्पणीमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदेंवर केलेल्या टिप्पणीमुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील खार येथे असलेल्या हॅबिटॅट कॉमेडी क्लबमध्ये तोडफोड केली.
या प्रकरणावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. ‘कामरा याने माफी मागितली पाहिजे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अपमान करण्याचा काम केलं हे चुकीचं आहे’, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आता यावर कुणाल म्हणाला, मी एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची माफी मागणार नाही. मी कोणालाही घाबरत नाही. मी माझ्या पलंगाखाली लपून बसलेलो नाही.’ असं तो म्हणाला आहे.
My Statement – pic.twitter.com/QZ6NchIcsM
— Kunal Kamra (@kunalkamra88) March 24, 2025
तसेच ज्या ठिकाणी त्याचा कार्यक्रम घेतला होता ती जागा एकनाथ शिंदे समर्थकांनी उद्ध्वस्त केली आहे. त्यामुळे आता कुणालने त्याच्या पुढच्या कार्यक्रमासाठी नवी जागा निवडली आहे. तो म्हणाला, “माझ्या पुढच्या कार्यक्रमाचं ठिकाण असं असेल जे पाडण्याची अधिक गरज आहे. मी एल्फिन्स्टन ब्रिज (प्रभादेवी) किंवा मुंबईतील अशा इमारतीची निवड करेन जी पाडण्याची गरज आहे.” असं त्याने सांगितलं आहे.
एल्फिन्स्टन ब्रिज १० एप्रिलपासून बंद !
मुंबईतील एल्फिन्स्टन ब्रिज १० एप्रिलपासून बंद केला जाणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) हा १२५ वर्षे जुना पूल लवकरच पाडणार आहे. त्याजागी शिवडी-वरळी एलिव्हेटेड कनेक्टर प्रकल्प उभारण्याची एमएमआरडीएची योजना आहे. एल्फिन्स्टन पूल पाडून तिथे डबल डेकर पूल उभारला जाणार आहे.





