Kuldeep Yadav Engagement : कुलदीपचा पार पडला साखरपुडा; बालपणीच्या मैत्रिणीसोबत नव्या इनिंगला सुरुवात!

Kuldeep Yadav Engagement with Childhood Friend : टीम इंडियाचा अनुभवी फिरकीपटू कुलदीप यादवने आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. या स्टार खेळाडूने बालपणीची मैत्रिण वंशिकासोबत लखनौ येथे साखरपुडा उरकला आहे. या खास प्रसंगी त्यांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते, ज्यात क्रिकेटर रिंकू सिंह याच्यासह इतर काही खेळाडूंही हजर होते.
कोण आहे वंशिका?
वंशिका ही कानपूरच्या श्याम रहिवासी असून सध्या ती एलआयसी (LIC) मध्ये नोकरी करते. साखरपुड्याचा सोहळा ४ जून २०२५ रोजी लखनऊमध्ये अतिशय साध्या पण सुंदर पद्धतीने पार पडला. या समारंभाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. त्याचबरोबर कुलदीप आणि वंशिका यांच्यावर मोठ्या प्रमाणात शुभेच्छांचा वर्षाव होत आहेत.
Kuldeep Yadav gets engaged to his childhood friend Vanshika. (Abhishek Tripathi).
– Many congratulations to them. ❤️ pic.twitter.com/fdTncdtYa4
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 4, 2025
लखनौ येथे पार कुलदीप यादवचा साखरपुडा –
कुलदीप यादवचा जन्म १४ डिसेंबर १९९४ रोजी उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यात झाला. या उत्कृष्ट फिरकी गोलंदाजाने टीम इंडियासाठी खूप चांगली कामगिरी केली आहे. भारतीय संघाला आता इंग्लंडचा दौरा करायचा आहे. या दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे आणि कुलदीप यादवलाही भारतीय संघात स्थान मिळाले आहे. इंग्लंडविरुद्धच्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत कुलदीप यादव चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करेल आणि त्याच्या संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावू इच्छितो.
हेही वाचा – RCB Victory Rally : अनेकांना तुडवलं, श्वास घेण्यासही अडचण…; चिन्नास्वामी स्टेडियमवरील धक्कादायक Video समोर!
आयपीएल २०२५ मध्ये कुलदीपची कामगिरी –
दिल्ली कॅपिटल्सने खेळलेल्या १४ लीग सामन्यांपैकी ७ जिंकले, तर ६ सामने गमावले. याशिवाय १ सामना अनिर्णित राहिला. संघाने हंगामाचा शेवट पॉइंट टेबलमध्ये पाचव्या स्थानावर केला. कुलदीप यादवने १४ सामन्यांमध्ये २४.०६ च्या सरासरीने आणि ७.०७ च्या इकॉनॉमीने एकूण १५ विकेट्स घेतल्या.





