RCB Victory Rally : अनेकांना तुडवलं, श्वास घेण्यासही अडचण…; चिन्नास्वामी स्टेडियमवरील धक्कादायक Video समोर!

RCB Victory Rally : आरसीबी संघाने आयपीएल 2025 जिंकले आहे आणि त्यानंतर बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये संपूर्ण संघाचा सन्मान केला जात आहे. मात्र, या सन्मानादरम्यान असे काही घडले ज्याची कोणालाही अपेक्षा नव्हती.
प्रत्यक्षात, चिन्नास्वामी स्टेडियमजवळ चेंगराचेंगरी झाली आणि त्यात 7 जणांचा मृत्यू झाला. या चेंगराचेंगरीत 20 जण गंभीर जखमीही झाले आहेत. तर 10 जणांची प्रकृती गंभीर आहे. चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये महिलांचाही समावेश आहे.
RCB की विक्ट्री परेड से पहले चिन्नास्वामी स्टेडियम में मची भगदड़, महिला समेत 3 की मौत #Bengluru #IPL2025 #IPL #VICTOYPARED #Breaking https://t.co/KPsFMUKjT6 pic.twitter.com/SGaDyItDyG
— Indian Observer (@ag_Journalist) June 4, 2025
अपेक्षेपेक्षा जास्त लोक जमल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली आहे. पोलिसांनी या गर्दीला पांगवण्यासाठी लाठीमार केला. मात्र गर्दीवरील नियंत्रण सुटल्याने ही चेंगराचेंगरी झाली.
#Breaking in Bengaluru: Two persons including a kid have reportedly died during stampede at the Chinnaswamy Stadium during the RCB victory celebrations.
More than 25 persons are injured, the condition of six is critical #Bengluru #IPL2025 #IPL #VICTOYPARED pic.twitter.com/HkKVFnBRH6
— Indian Observer (@ag_Journalist) June 4, 2025
या चेंगराचेंगरीत बाजूला उभ्या असलेल्या कारच्या काचा फुटल्या आहेत. तर या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 15 ते 20 जण जखमी झाल्याचे समोर आले आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मोठ्या संख्येने गर्दी झाल्यामुळे लोकांना श्वास घेण्यासही अडचण येत होती. चेंगराचेंगरीत काही काही लोकांना तुडवण्यात आले आहे. त्यामुळे यात अनेकजण जखमी झाले आहेत.





