क्रिती सेननला करायचे आहे प्रभासबरोबर लग्न

मुंबई – क्रिती सेनन “आदिपुरुष’मध्ये प्रभासबरोबर दिसणार आहे. रामायणावरील या सिनेमाचे डायरेक्शन ओम राऊत करणार आहे. दोनच दिवसांपूर्वी “आदिपुरुष’चे शूटिंग सुरू झाले आहे.\
“बाहुबली’नंतर प्रभास त्याच्या सहकलाकारांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला आहे. अर्थात क्रिती सेननदेखील याला अपवाद नाही. तिला आता प्रभासला लाईफ पार्टनर करून घेण्याचे स्वप्न पडायला लागले आहे. अर्थात ही तिची काही ठाम भूमिका नाही.
तिने कधी कोणाबरोबर डेटिंग केले आहे का, तिचे कोणाबरोबर रिलेशनशीप आहे का, ती कोणाबरोबर लग्न करणार असा प्रश्न तिला एका मुलाखतीत विचारले गेले होते.
तेंव्हा तिच्यासमोर कार्तिक आर्यन, टायगर श्रॉफ आणि प्रभास असे पर्याय दिले गेले होते. त्यावर तिने मला प्रभासबरोबर लग्न करायची ईच्छा करायचे आहे, असे उत्तर दिले.
मात्र त्या प्रश्नावर आणखी एक उत्तर तिने दिले आहे. तिला टायगर श्रॉफबरोबर डेटिंग कायचे आहे आणि कार्तिक आर्यनबरोबर फ्लर्ट करायचे आहे.
तिचे हे उत्तर मनोरंजन करून घेण्यासाठी चांगले आहे. “आदिपुरुष’मध्ये तिची आणि प्रभासची केमिस्ट्री प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणार आहे, हे यावरून लक्षात घ्यायला हवे.





