क्रिती सॅननची बहीण नुपूरचा विवाह ख्रिश्चन रितीरिवाजानुसार पडले पार; व्हिडिओ व्हायरल

Nupur Sanon | बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सॅननची बहीण नुपूर सॅनन विवाहबंधनात अडकली आहे. उदयपूरमध्ये १० जानेवारी २०२६ रोजी ख्रिश्चन रीतीरिवाजानुसार नुपूर आणि गायक स्टेबिन बेन यांचा लग्नसोहळा पार पडला. लग्नापूर्वी संगीत आणि हळदी समारंभ झाला. त्याचे व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर आता नुपूरच्या लग्न सोहळ्याची झलक समोर आली आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये क्रिती सॅननची बहीण नुपूरने पांढरा लग्नाचा गाऊन परिधान केलेला दिसत आहे. तिने स्टेबिन बेनसोबत केक कापला. यावेळी क्रिती सॅनन खूप भावुक दिसत होती. क्रितीसह कुटुंब आणि मित्रपरिवारही स्टेबिन आणि नुपूरचे कौतुक करताना दिसले. नुपूरच्या लग्नात क्रिती सॅननचा लूकही सुंदर दिसत होता. तिने ब्यू कलरचा वनपीस घातला होता.
View this post on Instagram
समोर आलेल्या माहितीनुसार, उदयपूर वेडिंगनंतर मुंबईत वेडिंग रिसेप्शन आयोजित केले जाणार आहे. ११ जानेवारीला पारंपरिक हिंदू पद्धतीनुसार होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे दोन प्रकारची लग्ने होत आहेत. Nupur Sanon |
नुपूर ही रवी तेजासोबत तेलगू चित्रपटात झळकली होती. याशिवाय अक्षय कुमार सोबतच्या ‘फिलहाल’ या गाण्यात दिसली होती. अक्षय कुमारसोबतच्या म्युझिक अल्बमनंतर नुपूर सॅननला लोकप्रियता मिळाली. ती लवकरच नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत ‘नूरानी चेहरा’ या चित्रपटात दिसणार आहे. तर स्टेबिन बेन हा ‘मेरा मेहबूब,’ ‘थोडा थोडा प्यार,’ आणि ‘बारिश’ या गाण्यांसाठी ओळखले जातो. त्याच्या गाण्यांना प्रेक्षकांचा देखील मोठा प्रतिसाद मिळाला. Nupur Sanon |
हेही वाचा:
“गझनी अन् औरंगजेब इतिहासात दफन झाले, तिथेच सोमनाथ उभा” ; गुजरातमध्ये पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन





