डोळ्यात अश्रू, तोंडात सिगरेट अन् अर्धवट प्रेम… ‘रांझणा’च्या सीक्वलमधील क्रितीचा जबरदस्त लूक आला समोर

Tere Ishq Mein Movie: 2013 साली आलेल्या धनुषच्या ‘रांझणा’ या चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले होते. या चित्रपटातील धुनषने साकारलेली ‘कुंदन’ची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या चित्रपटातील गाणीही विशेष गाजली. आता 12 वर्षानंतर कुंदन पुन्हा मोठ्या पडद्यावर परतणार आहे. ‘रांझणा’ चित्रपटाच्या यशानंतर धनुष आणि आनंद एल राय ‘तेरे इश्क में’ या सिनेमासाठी एकत्र येणार आहेत
‘तेरे इश्क में’मधील धनुषचा लूक काही दिवसांसमोरच समोर आला होता. आता या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीची घोषणा करण्यात आली आहे. धनुषसोबत अभिनेत्री क्रिती सेनॉन या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाचा दुसरा टीझर समोर आला असून, यामध्ये क्रिती सेनॉनच्या भूमिकेविषयी माहिती देण्यात आली आहे. तसेच, चित्रपटाची रिलीज तारीखही सांगण्यात आले आहे.
View this post on Instagram
‘काही प्रेमकथा या आगीतूनच पुन्हा जन्माला येतात’, असे कॅप्शन देत धनुष व क्रितीने चित्रपटाचा नवीन टीझर शेअर केला आहे. या चित्रपटात क्रिती सेनॉन ‘मुक्ती’ हे पात्र साकारणार आहे. या धमाकेदार टीझरमध्ये क्रिती स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेताना दिसत आहे. तसेच, डोळ्यात अश्रू, ओठात सिगरेट आणि लायटर पेटवत असल्याचे टीझरमध्ये दिसत आहे. या टीझरला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
‘रांझणा’च्या लोकप्रियतेनंतर आता धनुष आणि आनंद एल राय हे तब्बल 12 वर्षांनी या चित्रपटाचा सीक्वल घेऊन येत आहेत. यापूर्वी दोघांनी ‘रांझणा’ आणि ‘अतरंगी रे’ या चित्रपटात सोबत काम केले आहे. टीझरसोबतच या चित्रपटाची रिलीज तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे. आनंद एल रॉय यांचे दिग्दर्शन असलेला ‘तेरे इश्क में’ हा चित्रपट 28 नोव्हेंबर 2025 ला मोठ्या पडद्यावर रिलीज होईल.





