क्रिती सेनॉनने कॉस्मेटिक सर्जरीवर केले भाष्य

Kriti Sanon | बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनन सध्या ‘दो पट्टी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान क्रिती बोटॉक्स सर्जरीवर भाष्य केले. एका मुलाखतीत क्रिती सेननने बोटॉक्स कॉस्मेटिक सर्जरीबद्दल सांगितले.
क्रिती म्हणाली की, “ती कॉस्मेटिक शस्त्रक्रिया करणाऱ्या लोकांना जज करत नाही, परंतु तरुण मुलींवर नेहमीच परिपूर्ण दिसण्यासाठी दबाव आणू नये अशी माझी इच्छा आहे. मी कोणालाही जज करत नाही, प्रत्येकाचा स्वतःचा मार्ग असतो. तुमच्या शरीराचा कोणताही भाग बदलून तुम्हाला आत्मविश्वास वाटत असेल तर ते तुमच्यावर आहे. हा प्रत्येकाचा निर्णय असावा. मग तुमच्या या निर्णयाने जे काही होईल त्याला सामोरे जावे लागेल.” Kriti Sanon |
पुढे ती म्हणाली, “हे तुमचे जीवन आहे, तुमचे शरीर आहे, तुमचा चेहरा आहे. बोटॉक्स केलेल्या कोणत्याही व्यक्तीला मी जज करत नाही. पण हो, तरुण मुलींना नेहमी सुंदर दिसण्याचे दडपण जाणवू नये असे मला वाटते. कोणीही प्रत्येक वेळी परिपूर्ण दिसू शकत नाही. मी पण खूप वेळा दिसले नाही. जर तुम्ही अशा व्यवसायात असाल तर तुमच्यातील एक भाग नेहमीच चांगला दिसला पाहिजे.” Kriti Sanon |
क्रिती म्हणाली की, “जर तुम्हाला नैसर्गिकरित्या सुंदर दिसायचे असेल तर मी म्हणेन की तुम्ही तुमचे आरोग्य, आहार आणि मानसिक स्थितीची काळजी घ्या. हे फार महत्वाचे आहे. आपण आपल्या मानसिक आरोग्यासाठी जे काही करतो ते आपल्या चेहऱ्यावरही दिसून येते. तुम्ही स्वतःची काळजी कशी घेत आहात यावर सर्व अवलंबून असते.” Kriti Sanon |
दरम्यान, क्रिती सेननचा ‘दो पट्टी’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. यात क्रिती व्यतिरिक्त काजोल आणि शाहीर शेख देखील आहे. शाहीर शेखचा हा बॉलिवूड डेब्यू होता.
हेही वाचा:
बांगलादेशी हिंदूंचा जीव धोक्यात! “नोकरी सोडा नाहीतर…” ; मुस्लिम कट्टरपंथीयांकडून धमक्या





