Kriti Sanon : क्रिती सेनन आणि कबीर बाहिया यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण; लॉर्ड्स कसोटी सामन्यात दिसले एकत्र, फोटो पाहा…

Kriti Sanon : गेल्या काही दिवसांपासून बॅालीवूडमधील आघाडीची अभिनेत्री क्रिती सेनन आणि उद्योगपती कबीर बाहिया यांच्या अफेअरच्या बातम्या समोर येत आहेत. अशातच दोघांचाही एकत्रित फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याअगोदरही अनेकदा दोघेही एकत्र दिसत असल्याने त्यांच्या अफेअरबद्दलच्या चर्चा अधिक होताना दिसत आहे. मात्र, अद्यापर्यंत दोघांनीही अधिकृतपणे यावर भाष्य केलेले नाही.
इंग्लंडमधील लॉर्ड्स येथे भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी सामना पाहण्यासाठी हजेरी लावली होती. हा सामना पाहण्यासाठी अभिनेत्री क्रिती सेनन देखील तिचा कथित प्रियकर कबीर बाहियासोबत सामना पाहण्यासाठी आली होती. हा सामना दोघांनीही एन्जॅाय केला. त्याचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
कबीर बाहियाने स्वतः क्रिती सेननसोबत सामन्यादरम्यानचे फोटो शेअर केले आहेत. कबीरने त्याच्या इंस्टाग्रामवरून दोघांचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये क्रिती कबीरसोबत उभी असल्याचे दिसत आहे. फोटोमध्ये दोघेही खूप आनंदी दिसत आहेत. याआधीही क्रिती आणि कबीर यांना अनेकवेळा एकत्र पाहिले गेले आहे. मात्र, दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल कधीही उघडपणे भाष्य केलेले नाही. पण त्यांच्या अफेअरच्या चर्चांना आता या फोटोंमुळे उधाण आले आहे.





