Krishna Kumar Goyal: कृष्णकुमार गोयल यांच्या गौरवग्रंथाचे प्रकाशन
Krishna Kumar Goyal:

Krishna Kumar Goyal: कृष्णकुमार गोयल यांच्या गौरवग्रंथाचे प्रकाशन कोहिनूर उद्योग समूह आणि खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, तसेच प्रसिद्ध उद्योजक कृष्णकुमार गोयल यांच्या गौरवग्रंथाचे प्रकाशन नुकतेच केंद्रीय नागरी आणि विमान वाहतूक, तसेच सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाले.
कृष्णकुमार गोयल गौरव समितीच्या वतीने हा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला आहे. अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियूष गोयल, दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आदींनी या ग्रंथासाठी शुभसंदेश लिहिले आहेत. या ग्रंथात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार सुरेश कलमाडी आदी अनेक मान्यवरांनी गोयल यांचे विविध पैलू उलगडणारे लेखन केले आहे.
गोयल यांच्याविषयीचा हा ग्रंथ केवळ पुस्तक नसून, तो पुण्याच्या सामाजिक जडणघडणीतला एक महत्त्वाचा साक्षीदार ठरेल. आमच्यासारख्या कार्यकर्त्यालाही त्यांच्याविषयी लिहिण्याची संधी यानिमित्ताने मिळाली, असे गौरवोद्गार मोहोळ यांनी या वेळी काढले.
माझ्यावरील प्रेमापोटी पुण्यातील विविध क्षेत्रातील नामांकीत व्यक्तींनी एकत्र येऊन काढलेला हा ग्रंथ पाहून मी भारावून गेलो आहे. या ग्रंथामुळे नवीन पिढीला, तरुणाईला काही प्रेरणादायी मिळाले, तर ते मी माझे भाग्य समजेन, असे गोयल म्हणाले.





