कोयना धरण @ 66
Updated On:

सातारा – जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे कोयना धरणातील पाणीसाठा वाढला आहे. सध्या धरणात 66 टीएमसी पाणीसाठा आहे. गेल्या 24 तासात सरासरी 180 मीमी पाऊस झाला असून पावसाचा असाच जोर राहिल्यास दोन दिवसात पाणी वक्रद्वारापर्यंत पोहोचेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, गेल्या आठवडाभर विश्रांती घेणाऱ्या पावसामुळे धरण पुर्ण क्षमतेने भरेल का नाही, अशी चिंता व्यक्त होत असताना शुक्रवारी दुपारपासून पावसाने नॉन स्टॉप बॅटींग केली आहे. यामुळे कोयना धरण पुर्ण क्षमतेने भरेल, अशी आशा निर्माण झाली आहे.





