खेडमध्ये धावणार कोविड जनजागृती व्हॅन

राजगुरूनगर (प्रतिनिधी) – खेड तालुक्यात करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत सुमारे दीड हजार रुग्णाची संख्या झाली आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी खेड पंचायत समितीच्या माध्यमातून जनजागृती व शासन नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी खेड पंचायत समितीच्या माध्यमातून जनजागृती व्हॅन तयार करण्यात आली असून त्यामाध्यमातून तालुक्यात करोना संसर्ग रोखण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. या व्हॅनचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्या हस्ते रविवारी (दि. 2) करण्यात आला.
यावेळी पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे. गटविकास अधिकारी अजय जोशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ बळीराम गाढवे, माजी उपसभापती भगवान पोखरकर, जेष्ठ कार्यकतें मारुती सातकर उपस्थित होते. या व्हॅनमाध्यमातून तालुकाभर करोना विषाणू रोखण्यासाठी घ्यावयाची काळजी, त्यावर आधारित गाणी वाजविण्यात येणार आहेत. करोना टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना करायच्या मदतीसाठी कोठे संपर्क करायचा. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्स आदी बाबत फलक व मार्गदर्शक फलक या गाडीत लावण्यात आले आहेत.





