Pune News : कोथरुडमध्ये सायंकाळी महादेव मंदिर चौकातून नदीपात्राकडे जाणारा मार्ग बंद
Pune News : पुण्यातील कोथरुड परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुणे पोलीस वाहतूक शाखेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Pune News : कोथरुडमधील महादेव मंदिर चौकातून नदीपात्राकडे जाणारा अरुंद रस्ता वाहतूक कोंडीचा ठिकाण ठरत असल्याने या मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. दररोज सायंकाळी पाच ते रात्री आठ या वेळेत महादेव मंदिर चौकातून नदीपात्राकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. Pune News()
या कालावधीत नदीपात्राकडून महादेव मंदिर चौकाच्या दिशेने येणाऱ्या वाहनांनाच परवानगी देण्यात आली आहे. वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी मोटार वाहन कायद्यानुसार हा आदेश काढला आहे. हा बदल कोथरुड आणि डेक्कन वाहतूक विभागांतर्गत लागू करण्यात आला आहे. (Pune News)
महादेव मंदिर चौकातून नदीपात्राच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. पहिल्या पर्यायी मार्गानुसार महादेव मंदिर चौकातून डावीकडे वळून पाडळे पॅलेस सर्कल येथे उजवीकडे वळावे. तेथून शारदा सेंटर मार्गे इच्छित स्थळी जाता येणार आहे. (Pune News)
दुसऱ्या पर्यायी मार्गानुसार महादेव मंदिर चौकातून उजवीकडे वळून बालाजी एंटरप्रायजेस लेनमार्गे डावीकडे वळता येईल. या मार्गाने पुढे इच्छित स्थळी जाता येणार आहे. नागरिकांनी निर्धारित वेळेत पर्यायी मार्गांचा वापर करून वाहतूक कर्मचारी तसेच स्वयंसेवकांना सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे. (Pune News)
Pune News : सुप्यात दोन महिलांच्या खूनप्रकरणी आरोपीला अटक; चोरीचे सोन्याचे दागिने जप्त





