“कोरटकर तेलंगणात एका काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला”; भाजप नेत्याचा दावा

BJP MLA Parinay Fuke | इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देणारा आणि छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये करणारा प्रशांत कोरटकरला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गेल्या काही दिवसांपासून फरार असलेल्या कोरटकरला पोलिसांनी सोमवारी (२४ मार्च) तेलंगणाच्या मनचरियालमधून अटक केली आहे. त्यानंतर आज त्याला कोल्हापूर न्यायालयात हजर केलं जाणार आहे.
कोरटकरच्या अटकेनंतर आता अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहे. यातच आता भाजपा आमदार परिणय फुके यांनी प्रशांत कोरटकर हा तेलंगणात एका काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसला होता. तसेच त्याला तिकडे जाण्यासाठी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी मदत केली असल्याचा मोठा दावा केला आहे.
परिणय फुके काय म्हणाले ?
परिणय फुके म्हणाले, “प्रशांत कोरटकर याचं संरक्षण काढल्यानंतर चार-पाच दिवसांत त्याला अटक करण्यात आली आहे. तो तेलंगणात काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसला होता. त्यामुळे असं वाटतंय की काँग्रेस त्याला वाचवू पाहतेय. मात्र मी सर्वांना खात्री देतो की आमचं सरकार त्याला कडक शिक्षा करेल. प्रशांत कोरटकर हा तेलंगणात काँग्रेस नेत्याच्या घरात सापडला. त्याला काँग्रेसच्या नेत्याने आश्रय दिला होता.” BJP MLA Parinay Fuke |
पुढे ते म्हणाले, “महाराष्ट्रातील काँग्रेस नेते यात सामील आहेत. इथल्या काही नेत्यांनी सांगितलं की कोरटकरला कोणत्या मार्गाने तेलंगणात नेलं. गडचिरोलीमार्गे त्याला कशा पद्धतीने तेंलगणात नेलं ही माहिती ज्या लोकांनी दिली तेच लोक यात सहभागी आहेत. हे सगळं महाराष्ट्रातील वातावरण खराब करण्यासाठी केलं जात आहे. हा काँग्रेसचा प्रयत्न आहे. पक्षाने कोरटकरला एक महिन्यापासून संरक्षण दिलं होतं. महायुतीच्या सरकारला बदनाम करण्याचा त्यांचा कट होता.” BJP MLA Parinay Fuke |
यावर “कोरटकरला लपवणाऱ्या त्या काँग्रेस नेत्याचे सर्टिफिकेट घेऊन यावे. आपलं पाप झाकण्यासाठी काँग्रेसवर टीका करण्यात येत आहे,” असं विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. BJP MLA Parinay Fuke |
हेही वाचा:





