कोकण नगर गोविंदा पथकाची १० थरांंची विश्वविक्रमी सलामी; सरनाईकांकडून २५ लाख रुपयाचे पारितोषिक जाहीर
Dahi Handi 2025 | राज्यात दहीहंडीनिमित्त उत्सवाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मुंबई, ठाण्यातील दहीहंडी विशेष चर्चेचा विषय ठरते. मुंबई सुरु असलेल्या पावसामुळे गोविंदा पथकांच्या आनंदात आणखी वाढ झाली आहे. याचदरम्यान आता यंदाच्या वर्षी ठाण्यात जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाने तब्बल १० थर रचून विश्वविक्रम केला.
जोगेश्वरी येथील कोकण नगर गोविंदा पथकाने ही विश्वविक्रमी कामगिरी करून दाखवली. यानंतर सर्वांनी एकच जल्लोष केला. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती दहीहंडी कार्यक्रमात १० थर रचण्याचा हा विश्वविक्रम करण्यात आला. यावेळी प्रताप सरनाईक यांनी आनंद व्यक्त करत या पथकाला २५ लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. Dahi Handi 2025 |
View this post on Instagram
प्रताप सरनाईक म्हणाले, “कोकण नगर मनापासून अभिनंदन करतो. खऱ्या अर्थाने राष्ट्रभक्ती दाखवली. कोणी कितीही काही म्हणू द्या, तुम्ही मराठी एकी दाखवली. मी या पथकाला २५ लाखांचे बक्षीस जाहीर करतो. काही गोविंदा पथकानं वाटते आमचा विश्वविक्रम मोडणार नाही पण दुसरे पथक देखील विश्वविक्रम मोडत असतो. विश्व विक्रम मोडण्यासाठी असतो. याच मैदानावर आधी पण विश्व विक्रम झाला आहे आणि आताही झाले.” Dahi Handi 2025 |
‘जय जवान’ गोविंदा पथकाने रचले होते 9 थर | Dahi Handi 2025
मागील काही वर्षात ‘जय जवान’ गोविंदा पथक हे सातत्याने 9 थर रचत आलं आहे. यंदा मात्र, अत्यंत आश्चर्यरित्या जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा मंडळाने कडक 10 थर रचून विश्वविक्रमाला गवसणी घातली. गोविंदांनी दाखवलेल्या शिस्त, समन्वय आणि धाडसाचे उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाटसह आनंद व्यक्त केला.
यापूर्वी जय जवान गोविंदा पथकाने 2012 मध्ये 9 थर रचून विश्वविक्रम नोंदवला होता, परंतु कोकण नगर पथकाने यंदा हा विक्रम मोडला. या थरारक कामगिरीसाठी पथकाने अनेक महिने कठोर सराव केला होता.
हेही वाचा :
शमिता शेट्टीला नेटकऱ्यांनी सुनावले; राष्ट्रगीतदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल





