Ankita Walawalkar : कोकण हार्टेड गर्ल अंकिता पोहचली ‘शिवतीर्थ’वर; राज ठाकरेंना दिलं लग्नाच आमंत्रण, फोटो केला शेअर

बिग बॅास मराठी शोमुळे घराघरात पोहचलेले सर्वांची लाडकी बनलेली कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर लवकरच लग्न करणार आहे. आता नुकतीच तिने होणारा पती कुणाल भगतसह राज ठाकरे यांच्या निवासस्थान शिवतीर्थवर भेट घेत त्यांना लग्नाची निमंत्रण पत्रिका दिली आहे. लग्नाचे निमंत्रण देतानाचा फोटो अंकिताने तिच्या इन्स्टाग्रावर अकाउंटवरून शेअर केला आहे. या फोटोमध्ये राज ठाकरे यांच्या सोबत त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे देखील दिसत आहेत.
सध्या अंकिता लग्नाची जोरदार तयारी करताना दिसत आहे. अंकिताने सर्वात आधी तिच्या लग्नाची बातमी राज ठाकरेना सांगितली होती. बिग बॅासच्या घरात गेल्यानंतर चांगला खेळ करत तिने प्रेक्षकांची मने जिंकली होती. या शोच्या वेळी बिग बाॅसच्या घरात तिने मी खूप जास्त भावनिक मुलगी असल्याचे तिने सांगितले होते. तिच्या होणाऱ्या पतीने नुकत्याच येवून गेलेल्या येक नंबर या सिनेमात काम केले आहे. राज साहेबांना आम्ही गुढीपाडव्यालाच लग्नाबद्दल सांगितले होते. पण बिग बॅासमुळे सगळ्या गोष्टी पुढे ढकलल्या गेल्या असल्याचे अंकताने सांगितले.
लग्न मार्चमध्ये होण्याची शक्यता
अंकिता आणि कुणाल हे दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाची तारीख अजून सांगितली जात नसली तरी मार्च महिन्यात त्यांचा विवाह होऊ शकतो, अशी माहिती मिळत आहे. तिचा होणारा पती कुणाल याने राज ठाकरे यांच्याविषयीच्या येक नंबर या सिनेमातील गाण्यांना संगीत दिले आहे. तसेच त्याने बऱ्याच सिनेमातील गाणी आणि मालिकांचे शीर्षकगीत संगीतबद्ध केली आहेत.
भेट आणि प्रेम
अंकिता झी मराठीसाठी एक अॅवार्ड शोसाठी होस्ट करत होती. त्या सोहळ्यात कुणाल भगतला पुरस्कार मिळाला होता. या कार्यक्रमात दोघांची भेट झाली. त्यानंतर मैत्री आणि मग पुढे प्रेम झालं. अंकिता वालावलकर आणि कुणाल भगत यांनी लक्ष्मी निवास या मालिकेचे शीर्षक गीत तयार केले आहे.





