‘…६ तासांत एफआयआर नोंदवा’ ! बंगालमध्ये डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेवर सरकारची कडक कारवाई

Kolkata Doctor’s Protest । पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता याठिकाणी स्वात्रंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये आंदोलन करणाऱ्या लोकांवर बदमाशांनी हल्ला केला. त्यांनी आंदोलक डॉक्टरांना मारहाण करत रुग्णालयाची तोडफोड केली. या घटनेबाबत केंद्र सरकारने कडक कारवाई करत झाले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे, ज्यामध्ये ,”आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांवर हिंसाचार झाल्यास, 6 तासांच्या आत एफआयआर नोंदवावा. ” असे म्हटले आहे.
आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, “कर्तव्यावर असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यावर हल्ला किंवा कोणत्याही प्रकारचा हिंसाचार झाल्यास, घटनेच्या 6 तासांच्या आत एफआयआर दाखल करण्याची जबाबदारी रुग्णालय/संस्थेच्या प्रमुखाची असेल. ” हे निवेदन दोन कारणांसाठी देण्यात आले आहे. यातील पहिले प्रकरण म्हणजे आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील महिला डॉक्टरच्या बलात्कार-हत्येचे प्रकरण. दुसरे म्हणजे बुधवारी रात्री तेथे आंदोलन करणाऱ्या लोकांवर आणि डॉक्टरांवर हल्लेखोरांनी हल्ला केला.असे म्हटले आहे .
आरजी मेडिकल कॉलेजमध्ये काय घडलं? Kolkata Doctor’s Protest ।
बुधवारी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला येथील महिला डॉक्टरांवर झालेल्या अत्याचाराविरोधात सर्वसामान्य नागरिक आणि डॉक्टर मोठ्या संख्येने निदर्शने करत होते. त्याचवेळी 40 हून अधिक लोकांचा हिंसक गट रुग्णालयात दाखल झाला. त्यांनी स्वत:ला आंदोलक म्हणून सादर केले, मात्र काही वेळाने त्यांचा खरा चेहरा समोर आला. या हल्लेखोरांनी रुग्णालयाच्या मालमत्तेचे नुकसान केले आणि पोलिसांवर दगडफेक केली. जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्यांचाही वापर करावा लागला.
हल्लेखोरांनी आपल्यासोबत लाठ्या, विटा आणि काठ्या आणल्या होत्या, त्यांच्या मदतीने त्यांनी रुग्णालयातील इमर्जन्सी वॉर्ड, नर्सिंग स्टेशन, मेडिकल आणि ओपीडीची तोडफोड केली. सीसीटीव्ही कॅमेरे तोडण्यात आले आणि ज्या ठिकाणी डॉक्टर आंदोलन करत होते त्या ठिकाणचीही तोडफोड करण्यात आली. या संपूर्ण घटनेत घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांच्या वाहनासह काही दुचाकींचेही नुकसान झाले. या संपूर्ण घटनेचे अनेक व्हिडिओही समोर आले आहेत.
रुग्णालयाच्या तोडफोडीप्रकरणी १९ जणांना अटक Kolkata Doctor’s Protest ।
कोलकाता पोलिसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आरजी कार हॉस्पिटलमध्ये अशांतता निर्माण करणाऱ्यांची ओळख पटवून त्यांना अटक केली आहे. आतापर्यंत 19 जणांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या सर्वांना 22 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हे हल्लेखोर कोणत्या संघटनेशी संबंधित होते हे अद्याप समोर आलेले नाही.





