कोल्हापूर: महावितरणच्या विद्युत तारांमुळे शाॅर्टसर्किट; शेतकऱ्याची काजू बाग जळून खाक

कोल्हापूर – खामदळे (ता. चंदगड) येथे गुरूवारी (दि. 6 फेब्रुवारी) शाॅर्टसर्किटने काजू बाग जळून शेतकऱ्याचे सुमारे 8 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. यामध्ये गवत गंज्याही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या. तुकाराम सदुप्पा पाटील यांच्या मालकीची ही बाग आहे. शेतकरी पाटील यांच्या टेक नावाच्या शेतातून विद्युत तारा गेल्या आहेत. काही दिवसांपासून तारा लोंबकळत होत्या.
शेतकरी तुकाराम पाटील यांनी सांगितले की, गट नंबर 241 व 239 मधील 5 एकर शेतात काजू बाग लावली होती. रात्रंदिवस कष्ट करून बाग वाढवली. नुकतेच त्यांना फुले लागली होती. अशातच महावितरणच्या विद्युत तारांमुळे शाॅर्टसर्किट होऊन एक हजार झाडांची काजू बाग जळाली आहे. अनेक झाडे होरपळली आहेत. नुकसान भरपाईसाठी महावितरणकडे मागणी करण्यात आली आहे. तसेच लोकप्रतिनिधींनी या प्रकरणात लक्ष देऊन नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणीही पाटील यांनी केली आहे.
शाॅर्टसर्किटमुळेच आग, तारा लोबकळ्याचा व्हिडीओ –
आगीनंतर बागेचा व्हिडीओ काढण्यात आला. यामध्ये काजू बाग उद्धवस्थ झाल्याचे दिसत आहे. अनेक झाडे होरपळी आहेत. तसेच विद्युत तार झाडांवर पडल्याचेही दिसत आहे. बागेत ठेवलेल्या गवताच्या गंजी जळून राख झाल्याचे व्हिडीओ आणि फोटोमध्ये दिसत आहे.
नुकसानग्रस्त काजू बागेचे व्हिडीओ आणि फोटो पहा –
महावितरणच्या विद्युत तारांमुळे शाॅर्टसर्किट; खामदळेतील शेतकऱ्याची काजू बाग जळून खाक
कोल्हापूर – खामदळे (ता. चंदगड) येथे गुरूवारी (दि. 6 फेब्रुवारी) शाॅर्टसर्किटने काजू बाग जळून शेतकरी तुकाराम सदुप्पा पाटील यांचे सुमारे 8 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. @CMOMaharashtra @MSEDCL pic.twitter.com/GuPbChXHsO
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) February 8, 2025





