मैदानात कोहली-गंभीर भिडले ! सोशल मीडियावर दोन्ही फ्रेंचाईसीचं वॉर.. एकमेकांविरोधात केली टिवटिव

मुंबई – आयपीएल 2023 च्या 43 व्या सामन्यात RCB संघाने 18 धावांनी विजय मिळवला. पण, या सामन्यानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात जोरदार वादावादी झाली. सामना संपल्यानंतर सर्व खेळाडू एकमेकांशी हस्तांदोलन करताना दिसले. यादरम्यान इतर प्लेअर्सवरून कोहली आणि गंभीरमध्ये वादावादी झाली. याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. या वादनानंतर दोन्हही टीम्स सोशल मीडियावर देखील आपापसात भिडल्याचे पाहायला मिळाले.
विराट कोहलीने लखनऊ सुपर जायंट्सचा खेळाडू काइल मेयर्सशी हस्तांदोलन करून त्याच्याशी बोलताच लखनऊचा मार्गदर्शक गौतम गंभीर मेयर्सला मागे खेचताना दिसला. अशा परिस्थितीत गौतम गंभीरच्या या वागण्यावर विराट कोहली चांगलाच संतापला आणि कर्णधार फाफ डुप्लेसीला काहीतरी बोलू लागला, यातूनच वादाला सुरुवात झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
या वादनानंतर सोशल मीडियावर दोन्हही टीम्समध्ये वॉर झाल्याचे पाहायला मिळाले. आयपीएलमध्ये लखनौ ने बंगळुरूवर एका विकेट ने विजय मिळवला होता हा सामना १० एप्रिल रोजी झाला होता. त्यावेळी “Ladies And Gentlement, This is how you…PLAY BOLD” असं ट्विट लखनौने केलं होत. आता काल झालेल्या मॅचमध्ये आरसीबीने लखनौवर विजय मिळवला. तर आरसीबीच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलने हेच ट्विट रिट्विट करत नवीन पोस्ट केली. यात “Adab se Haraye! #PlayBold” असं म्हंटल आहे.
Adab se Haraye! 🫡 #PlayBold https://t.co/AB4Uf5d5Ej
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) May 1, 2023
याआधी देखील या दोन्हही टीम्समध्ये ट्विटरवर असाच कलगी तुरा रंगला होता. ज्यावर फॅन्सने कमेंटचा पाऊस पाडला होता. कोहली आणि गंभीर यांच्या वादानंतर त्यांच्यावर कारवाई देखील करण्यात आली आहे. कोहली आणि गंभीर दोघेही IPL च्या आचार संहिता उल्लंघनात दोषी ठरले आहेत.
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) May 1, 2023
झालेल्या वादासाठी शिक्षा म्हणून कोहली आणि गंभीरची मॅच फी कापण्यात आली आहे. दोघांना लखनौमधील सामन्याची मॅच फी मिळणार नाही. शिक्षा म्हणून त्यांची 100 टक्के मॅच फी कापण्यात आली आहे.विराट आरसीबीकडून खेळात आहे तर गौतमी गंभीर लखनौ टीमचा मार्गदर्शक म्ह्णून काम पाहतो.





