Mumbai Property: अबब! मुंबईत खरेदी केले तब्बल 185 कोटींचे घर, जाणून घ्या कोण आहे ‘ही’ महिला

Mumbai Property: मुंबई सारख्या प्रत्येकाची स्वप्न पूर्ण करणाऱ्या शहरात स्वतःच्या हक्काचे घर असावे, असे कोणाला वाटत नाही. या शहरात मालमत्ता खरेदी करणे हे सर्वसामान्यच काय श्रीमंतांच्या देखील आवाक्याच्या बाहेर आहे. मात्र, काहीजण असेही आहेत जे कोट्यावधी रुपये खर्चून मुंबईमध्ये स्वतःचे घर खरेदी करत आहेत. अशाच एका महिलेने तब्बल 185 कोटी रुपये खर्चून मुंबईत आलिशान पेंटहाउस खरेदी केला आहे. या महिलेचे नाव सीमा सिंह आहे. ही महिला नक्की कोण आहे? याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
सीमा सिंहने मुंबईच्या वरळी या भागातील लोढा सी-फेस प्रोजेक्टमध्ये घर खरेदी केले आहे. तिने या प्रोजेक्टच्या ए-विंगमधील 30व्या मजल्यावर शानदार पेंटहाउस खरेदी केले असून, या पेंटहाउसची किंमत तब्बल 185 कोटी रुपये एवढी आहे.
या मालमत्तेचे क्षेत्रफळ 14,866 वर्गफूट एवढे आहे. सीमा सिंहने यासोबतच 9 पार्किंग स्पेस देखील खरेदी केले आहेत. या व्यवहारासाठी तिने 9.25 कोटी रुपये स्टँप ड्यूटी देखील भरली.
कोण आहे सीमा सिंह?
सीमा सिंह ही अल्केम लॅबोरेट्रीज नावाच्या एका कंपनीच्या प्रमोटर आहे. ही कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्टेड असून, याचे मार्केट कॅप जवळपास 64 हजार कोटी रुपये आहे. तिच्या कंपनीची 2.16 टक्के हिस्सेदारी आहे.
याआधी तिने जून 2024 मध्ये अल्केम लॅबोरेट्रीजमधील 0.3 क्के हिस्सेदारीची विक्री करत 177 कोटी रुपये उभारले होते. तिने 4956 रुपये प्रति शेअर याद्वारे 3.58 लाख शेअर्सची विक्री केली होती. सीमाने ज्या इमारतीमध्ये पेंटहाउस खरेदी केला आहे, तो लोढा ग्रुपचा प्रोजेक्ट आहे. लोढा ग्रुपला भारतातील प्रमुख शहरांमध्ये लग्झरी प्रोजेक्ट उभारण्यासाठी ओळखले जाते.





