कलम 370 रद्द केल्यापासून 1700 काश्मिरी पंडितांना मिळाली सरकारी नोकरी
Updated On:

नवी दिल्ली – कलम 370 रद्द केल्यापासून आणि पूर्वीचे राज्य, केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागले गेल्यानंतर 5 ऑगस्ट 2019 पासून जम्मू आणि काश्मीर प्रशासनाने विविध सरकारी विभागांमध्ये सुमारे 1,700 काश्मिरी पंडितांची सरकारी नोकरीत नेमणूक केली आहे अशी माहिती आज राज्यसभेत देण्यात आली.
केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सांगितले की, जम्मू आणि काश्मीर सरकारने सादर केलेल्या आकडेवारीनुसार, 44,684 काश्मिरी स्थलांतरित कुटुंबे जम्मूच्या मदत आणि पुनर्वसन आयुक्त (स्थलांतरित) कार्यालयात नोंदणीकृत आहेत, ज्यात 1,54,712 व्यक्तींचा समावेश आहे.
काश्मिरी स्थलांतरित कुटुंबांचे पुनर्वसन करण्यासाठी, जम्मू आणि काश्मीर सरकारने 5 ऑगस्ट 2019 पासून विविध प्रयत्न सुरू केले असून त्या अंतर्गतच सुमारे 1700 काश्मीरी पंडितांना सरकारी नोकरी देण्यात आली आहे.





