तुम्हाला माहित आहे की जवळजवळ प्रत्येक घरात मांजरी आढळतात. बहुतकांना मांजरी पाळायला आवडतात. पण तुम्हाला माहित आहे का, जगात 500 दशलक्षाहून अधिक पाळीव मांजरी आहेत. बरेच लोक त्यांना खूप शुभ मानतात तर काही अशुभ मानतात. नुकतेच म्हणजे 8 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय मांजर दिवस साजरा केला गेला. या पार्श्वभूमीवर चला जाणून घेऊया मांजरांबद्दलच्या काही मजेदार व विचित्र गोष्टी!

1. तुम्हाला माहीत आहे का की मांजरी दिवसातून 13 ते 14 तास झोपते. ते आपल्या आयुष्यातील 70% झोपेत घालवते.

2. तुम्हाला माहीत आहे का की, अलास्कामध्ये 15 वर्षांसाठी एका मांजरीला महापौर बनवण्यात आले होते.

3. जपानमध्ये काळी मांजर भाग्यवान मानली जाते आणि आपल्या भारतात बरेच लोक तिला अशुभ मानतात.

4. तुम्हाला माहीत आहे का की मांजर मिठाई खाऊ शकत नाही.

5. तुम्हाला माहित आहे का की मांजरी सुमारे 100 प्रकारचे आवाज काढू शकतात, तर कुत्रे फक्त 10 प्रकारचे आवाज काढू शकतात.

6. जगातील सर्वाधिक मांजरी उत्तर अमेरिकेत पाळल्या जातात. 63 दशलक्ष कुत्र्यांच्या तुलनेत 73 दशलक्ष मांजरी आहेत.

7. मांजर हे प्राण्यांच्या अनेक प्रजाती नष्ट होण्याचे कारण मानले जाते.

8. अमेरिकेत दरवर्षी 86,000 लोक मांजरीमुळे जखमी होतात.

9. अमेरिकेत कुत्र्यांपेक्षा जास्त मांजरी पाळल्या जातात, सुमारे 88 दशलक्ष मांजरी एकट्या अमेरिकेत आहेत!

10. ‘डस्टी’ नावाच्या मांजरीने आपल्या आयुष्यात 420 मुलांना जन्म दिला, हा एक विश्वविक्रम आहे.

11. आतापर्यंत सापडलेली सर्वात मोठी मांजर 48.5 इंच (1.23 मीटर) होती.

12. प्राचीन इजिप्तमध्ये, लोक त्यांच्या मांजरीच्या मृत्यूबद्दल शोक करण्यासाठी त्यांच्या भुवया कापत असत.

13. मांजरांशी संबंधित अंधश्रद्धेचा उगम इराकमध्ये झाला.

14. दूध पिणे हे मांजरींच्या आरोग्यासाठी खूप वाईट आहे यावर तुमचा विश्वास बसणार नाही. सत्य हे आहे की दुधात लैक्टोज असते आणि मांजर लैक्टोज अजिबात पचवू शकत नाहीत. त्यांना कधीही दूध देऊ नये.

15. मांजरीला चॉकलेट खायला दिल्यास तिचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे मांजर पाळणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे.

16. तुम्हाला माहीत आहे का की मांजरीला 3 पापण्या असतात. तुम्ही याकडे कधी लक्ष दिले आहे का?

17. त्यांच्याबद्दल आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे मांजरी आणि उंदरांमध्ये ही खास गोष्ट आहे की ते समुद्राचे पाणी देखील पिऊ शकतात.

18. काही ठिकाणी मांजरी इतकी महाग आहे की एक मांजर 10 हजार डॉलर्सपेक्षा जास्त म्हणजे जवळपास साडेआठ लाख रुपये किंमतीला उपलब्ध आहे.

19. मांजरीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ती कितीही उंचावरून पडली तरी तिला काहीही होणार नाही. काही मांजरी 32 मजली इमारतीवरून खाली जमिनीवर पडल्यानंतरही टिकून राहतात कारण त्यांच्याकडे विशेष राईटिंग रिफ्लेक्स असते. शेवटच्या क्षणी तिचे शरीर वळवण्यासाठी.

20. हे खूप मजेदार आहे, की मांजरीचे मूत्र अंधारात देखील चमकते.

21. कुत्रे आणि मांजर देखील माणसांप्रमाणेच डाव्या किंवा उजव्या हाताचे असतात.

22. दरवर्षी लोक त्यांच्या पाळीव कुत्रे आणि मांजरांच्या आहारावर 3 लाख 57 अब्ज रुपये खर्च करतात.

23. मांजरी त्यांच्या उंचीच्या 7 पट उंच उडी मारू शकतात.

24. उत्तर अमेरिकेत काळ्या मांजरीला अपशकुनी मानले जाते तर ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि जपानमध्ये काळ्या मांजरीला भाग्यवान मानले जाते.

25. इटलीतील एका मांजरीला तिच्या मालकाकडून $13 दशलक्ष वारसा मिळाला.

26. जपानसह अनेक देशांमध्ये, “कॅट कॅफे” देखील आहेत जिथे तुम्ही मांजरींसोबत कॉफी पिऊ शकता आणि तासन्तास फिरू शकता.

27. आपल्या बोटांचे ठसे मांजरीच्या नाकाच्या ठशासारखे असतात.

28. मांजरांचा 95 टक्के DNA वाघासारखाच असतो.म्हणूनच त्यांना ‘वाघाची मावशी’ असेही म्हणतात.

29. प्रौढ मांजरीला 230 हाडे असतात.

30. मांजरीचे हृदय मानवी हृदयापेक्षा दुप्पट वेगाने धडधडते.

31. रशियामध्ये एक थिएटर आहे जिथे सर्व अभिनेते आणि अभिनेत्री चक्क मांजरी आहेत.

32. प्राचीन इजिप्तमध्ये मांजरीला मारल्यास मृत्युदंडाची शिक्षा दिली जायची. जरी एखाद्याने जाणूनबुजून मांजर मारले नसले तरीही त्याला मृत्युदंड मिळायचाच.

33. मांजरींच्या शरीरात 32 स्नायू असतात जे त्यांचे बाह्य कान नियंत्रित करतात तर मानवाकडे फक्त 6 असतात.

34. युट्यूबवरील सर्वात जुना व्हिडिओ 1894 मध्ये चित्रित करण्यात आलेल्या मांजरीचा आहे.

35. एका संशोधनात असे आढळून आले आहे की मांजर पाळल्याने हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी होते.

36. एक तरुण मांजर फक्त माणसांशी बोलण्यासाठी म्याव करते.

37. 60 च्या दशकात, सीआयएने सोव्हिएत युनियनमध्ये मांजरींचा हेर म्हणून वापर केला. पहिल्या डिटेक्टिव्ह मांजरीला टॅक्सीने मारले होते.

38. मांजर तिच्या मालकाचा आवाज ओळखते परंतु त्याकडे जास्त लक्ष देत नाही.

39. प्राचीन इजिप्तमध्ये लोक त्यांच्या मांजरीच्या मृत्यूच्या दुःखात स्वतःच्या भुवया कापत असत.

40. स्कॉटलंडमधील एका प्रसिद्ध डिस्टिलरीत टेसर नावाची मांजर होती. तिने आपल्या 24 वर्षांच्या आयुष्यात एकूण 28,899 उंदीर मारले. टेसरला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही स्थान मिळाले आहे. पण त्याहूनही आश्चर्याची गोष्ट म्हणजे टेसरच्या यशानंतर एम्बर नावाची दुसरी मांजर याच हेतूने इथे ठेवण्यात आली होती पण तिच्या 20 वर्षांच्या कार्यकाळात तिला उंदीरही पकडता आला नाही.