WhatsApp चॅट डिलीट झाले? जाणून घ्या मेसेज परत मिळवण्याची पूर्ण प्रोसेस

WhatsApp Delete Messages Recovery: सध्याच्या काळात WhatsApp हे सर्वात महत्त्वाच्या अॅपपैकी एक आहे. या अॅपच्या माध्यमातून आपण मित्र-मैत्रिणींपासून ते ऑफिसमधील कर्मचाऱ्यांपर्यंत अनेकांशी संवाद साधत असतो. अनेकजण महत्त्वाचे संभाषण देखील व्हॉट्सअॅपमध्ये सेव्ह करतात. मात्र, हे महत्त्वाचे चॅट डिलीट झाल्यास समस्या निर्माण होते. तुमचे देखील व्हॉट्सअॅप चॅट डिलीट झाल्यास कशाप्रकारे परत मिळवू शकता? त्याविषयी जाणून घेऊया.
WhatsApp बॅकअपची घ्या मदत
चॅट परत मिळवण्याची सर्वात सोपी पद्धत म्हणजे बॅकअप. व्हॉट्सअॅप नियमितपणे चॅट्सचे बॅकअप घेते. हे चॅट्स तुम्ही गुगल ड्राइव्ह अथवा फोनच्या लोकल स्टोरेजमध्ये सेव्ह करू शकता.
यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम अॅप अनइंस्टॉल करावे लागेल. त्यानंतर Google Play Store अथवा App Store वरून पुन्हा डाउनलोड करा. आता अॅप उघडून मोबाइल नंबर व्हेरिफाय करा. यानंतर तुम्हाला बॅकअप रिस्टोरचा पर्याय दिसेल, तो निवडा. बॅकअप रिस्टोर केल्यानंतर तुम्हाला सर्व चॅट्स परत मिळतील.
तुम्ही लोकल बॅकअपच्या मदतीने देखील चॅट परत मिळवू शकता. तुमच्या फाइल मॅनेजमध्ये msgstore.db.crypt12 नावाने फाइल उपलब्ध असेल. ही फाइल तुम्ही रिस्टोर करू शकता. मात्र, लक्षात घ्या की, मेसेज परत मिळवण्यासाठी तुम्ही अॅपला बॅकअपची परवानगी दिलेली असणे आवश्यक आहे. नियमितपणे व्हॉट्सअॅसपद्वारे मेसेज बॅकअप करणे गरजेचे आहे.
थर्ड पार्टी अॅप्सचा करा उपयोग
थर्ड पार्टी अॅप्सच्या मदतीने देखील तुम्ही चॅट परत मिळवू शकता. प्ले स्टोर व वेगवेगळ्या सर्च इंजिन साइट्सवर डेटा परत मिळवून देणारे अनेक थर्ड पार्टी अॅप्स उपलब्ध आहेत. मात्र, हे अॅप्स वापरताना काळजी घेणे गरजेचे आहे. अनेक थर्ड पार्टी अॅप्स तुमची खासगी माहिती चोरी करू शकतात.





