Home Loan Charges: गृहकर्ज काढताय? या अतिरिक्त शुल्कांबाबत जाणून घ्या, अन्यथा होईल नुकसान

Home Loan Charges: स्वतःचे हक्काचे घर असावे, असे प्रत्येकाला वाटते. एकरकमी पैसे भरून घर खरेदी करणे प्रत्येकालाच शक्य होत नाही. अशावेळी, गृहकर्ज हा एक चांगला पर्याय आहे. मात्र, अनेकांना गृहकर्जाची प्रक्रिया माहित नसते. तसेच, गृहकर्ज काढताना लागणाऱ्या अतिरिक्त शुल्काकडे देखील दुर्लक्ष केले जाते. या लेखातून गृहकर्ज काढताना कोणते अतिरिक्त शुल्क तुमच्याकडून आकारले जाऊ शकते, याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
अॅपप्लिकेशन शुल्क
तुम्ही जर बँक अथवा एनबीएफसीकडून गृहकर्ज घेत असाल तर पूर्ण प्रक्रियेसाठी अॅमप्लिकेशन शुल्क आकारले जाते. बँकेकडून गृहकर्ज मंजूर न झाल्यास हे शुल्क परत मिळत नाही. अॅ्प्लिकेशन शुल्क हे नॉन-रिफंडेबल होते.
मॉर्गेज डीड शुल्क
गृहकर्ज काढताना मॉर्गेज डीड शुल्क देखील आकारले जाते. तुम्ही किती कर्ज काढत आहात, त्याआधारावर हे शुल्क ठरते. अनेक बँका ग्राहकांनी जास्तीत जास्त गृहकर्जाचा फायदा घ्यावा, यासाठी हे शुल्क माफ देखील करतात.
प्रीपेमेंट शुल्क
अनेकदा निश्चित कालावधीच्या आधीच ग्राहकांकडून कर्जाची परतफेड केली जाते. यामुळे बँकांना तोटा सहन करावा लागू शकतो. अशावेळी हे नुकसान भरून काढण्यासाठी बँकांकडून पेनल्टी आकारली जाते.
कायदेशीर शुल्क
तुम्ही जी मालमत्ता खरेदी करत आहात, त्याची कायदेशीर स्थिती तपासण्यासाठी बँकेकडून वकिलाची नेमणूक केली जाते. यासाठीचे शुल्क कर्जदाराकडून वसूल केले जाते. तसेच, या मालमत्तेला आधीच कायदेशीर परवानग्या प्राप्त असल्यास कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागत नाही.
कमिटमेंट शुल्क
बँका व वित्तीय संस्थाकडून प्रोसेसिंग आणि अप्रूव्हलनंतर कर्ज घेण्यासाठी ठराविक कालावधी निश्चित केला जातो. या निर्धारित कालावधीमध्ये कर्ज न घेतल्यास तुम्हाला कमिटमेंट फी द्यावी लागू शकते.
गृहकर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
- ओळखपत्र- आधार कार्ड/पासपोर्ट/ड्रायव्हिंग लायसन्स
- पॅनकार्ड
- पत्त्याचा पुरावा
- उत्पन्न पुरावा
- सॅलरी स्लिप/बँक स्टेटमेंट
- आयटीआर भरल्याचा पुरावा
- मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे





