Eknath Shinde : एकनाथ शिंदेंना जबर धक्का? अनेक पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे; राजकीय वर्तुळात खळबळ
Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला जालना जिल्ह्यात अंतर्गत बंडखोरीचा मोठा फटका बसला आहे.

Eknath Shinde : मंठा-परतूर विधानसभा मतदारसंघातील तालुकाप्रमुखांसह अनेक स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे यांच्या कथित मनमानी कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जालन्यात मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली आहे. (Eknath Shinde)
जिल्हाप्रमुखांच्या कार्यपद्धतीवर नाराजी
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ए. जे. बोराडे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांच्याकडे जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. (Eknath Shinde)
मात्र, पक्षातील जुन्या आणि निष्ठावंत पदाधिकाऱ्यांना डावलून स्वतःच्या मर्जीने पक्षाचे कार्यक्रम राबवले जात असल्याचा आरोप नाराज पदाधिकाऱ्यांनी केला आहे. याच नाराजीतून मंठा येथील तालुकाप्रमुखांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. (Eknath Shinde)
‘आनंदाचा शिधा’ वाटपावरून वाद
तालुकाप्रमुख उदय बोराडे यांनी जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षभरापासून स्थानिक पदाधिकाऱ्यांना पक्षाच्या कामकाजात डावलले जात आहे. एकनाथ शिंदे यांनी पाठवलेल्या ‘आनंदाचा शिधा’ वाटपाच्या कार्यक्रमातही स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्यात आले नाही. हा शिधा जिल्हाप्रमुखांनी आपल्या नातेवाइकांच्या आणि मर्जीतील लोकांच्या हस्ते वितरित केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. (Eknath Shinde)
‘आमची नाराजी पक्षावर नाही, स्थानिक नेतृत्वावर’
सामूहिक राजीनाम्यानंतर पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. पक्ष किंवा वरिष्ठ नेत्यांवर आमची कोणतीही नाराजी नाही. आमचा विरोध केवळ स्थानिक जिल्हाप्रमुखांच्या कथित मनमानी कारभाराला आहे, असे त्यांनी सांगितले. (Eknath Shinde)
सर्व पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्यांसह सामूहिक राजीनामे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आता या नाराजीची दखल घेत एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात आणि जालन्यातील पक्षांतर्गत वादावर तोडगा निघतो का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (Eknath Shinde)





