MI vs DC : मुंबईविरुद्धच्या ‘करो या मरो’ सामन्यापूर्वी दिल्लीला मोठा धक्का! ‘या’ स्टार खेळाडूला झाली दुखापत

KL Rahul Injured ahead MI vs DC match in IPL 2025 : आयपीएल २०२५ मधील ६३ वा सामना आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना दिल्ली कॅपिटल्ससाठी ‘करो या मरो’ अशा स्वरुपाचा आहे. मात्र, या सामन्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का बसला आहे. दिल्लीचा स्टार फलंदाज केएल राहुल जखमी झाला आहे. सराव सत्रादरम्यान त्याला ही दुखापत झाली.
मीडिया रिपोर्टनुसार, मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी सराव करताना केएल राहुलच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. त्यानंतर केएलने लगेच मैदान सोडले. तो आजचा सामना खेळेल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याशिवाय राहुलची दुखापत किती गंभीर आहे याची माहिती देखील उपलब्ध नाही.
𝙎𝙩𝙤𝙧𝙢 alert in Wankhede 🔥🌪#MI take on #DC in a clash with everything on the line 😬#TATAIPL | #MIvDC | @mipaltan | @DelhiCapitals pic.twitter.com/q7mT5Ut1zk
— IndianPremierLeague (@IPL) May 21, 2025
दिल्लीच्या अडचणी वाढल्या –
महत्त्वाच्या सामन्यापूर्वी राहुलची दुखापत दिल्लीसाठी अडचणी निर्माण करू शकते. केएल राहुल हा या संघाचा सर्वात प्रमुख भाग आहे. गेल्या सामन्यात राहुलने शानदार कामगिरी केली होती. गेल्या सामन्यात त्याने गुजरातविरुद्ध ११२ धावांची नाबाद खेळी केली होती. मात्र, यानंतर दिल्लीला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर दिल्लीसाठी आजचा सामना ‘करो या मरो’ अशा स्वरुपाचा झाला आहे.
हेही वाचा – IPL 2025 : आयपीएलमध्ये मोठा ट्विस्ट ! BCCI ने बदललं स्टेडियम; ‘या’ ठिकाणी पार पडणार अंतिम सामना
दिल्लीला कोणत्याही परिस्थितीत विजय आवश्यक –
जर दिल्ली कॅपिटल्सला प्लेऑफमध्ये टिकून राहायचे असेल, तर त्यांना आजचा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावा लागेल. जर दिल्ली आज हरली तर त्यांना प्लेऑफच्या फेरीत जाता येणार नाही. मुंबई संघाने आजचा सामना गमावला तर प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी आणखी एक संधी आहे, ते दुसरा सामना जिकूनही प्लेऑफमध्ये पोहोचू शकतो. मात्र, दिल्लीला कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकावाच लागेल.





