CM Siddaramaiah Resignation : कर्नाटकच्या राजकारणात खळबळ ! मुख्यमंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा
गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकच्या राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या हायव्होल्टेज ड्राम्यावर अखेर पडदा पडला आहे. सत्ताधारी काँग्रेस पक्षाने राज्यात मोठे फेरबदल (CM Siddaramaiah Resignation) करत सत्तेचे खांदेपालट केले आहे.

CM Siddaramaiah Resignation : गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकच्या राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या हायव्होल्टेज ड्राम्यावर अखेर पडदा पडला आहे. सत्ताधारी काँग्रेस पक्षाने राज्यात मोठे फेरबदल (CM Siddaramaiah Resignation) करत सत्तेचे खांदेपालट केले आहे.
कर्नाटकचे विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा (CM Siddaramaiah Resignation) दिला असून, त्यांच्या जागी आता काँग्रेसचे संकटमोचक मानले जाणारे नेते डी. के. शिवकुमार हे राज्याची धुरा सांभाळणार आहेत.
“कर्नाटकच्या जनतेच्या हितासाठी मी हा राजीनामा देत आहे,” अशी प्रतिक्रिया सिद्धरामय्या यांनी दिली आहे. विश्वसनीय सूत्रांनुसार, येत्या ३० मे रोजी डी. के. शिवकुमार कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची दाट शक्यता आहे.
काय होता तो ‘अडीच-अडीच वर्षांचा’ फॉर्म्युला?
तीन वर्षांपूर्वी कर्नाटकमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने प्रचंड बहुमताने विजय मिळवला होता. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार हे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर होते. मात्र, सिद्धरामय्या (CM Siddaramaiah Resignation) यांचा मोठा राजकीय अनुभव आणि जनाधार लक्षात घेता, पक्षाने त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ टाकली. परंतु, हा वाद मिटवण्यासाठी तेव्हाच हाय कमांडने ‘अडीच-अडीच वर्षांचा मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला’ ठरवला होता.
या सूत्रानुसार पहिली अडीच वर्षे सिद्धरामय्या मुख्यमंत्री राहतील.पुढील अडीच वर्षे डी. के. शिवकुमार यांच्याकडे राज्याची सूत्रे सोपवली जातील.त्याच ठरलेल्या करारानुसार आता सिद्धरामय्या यांनी सन्मानाने आपले पद सोडले आहे.
दिल्लीतील ६ तासांच्या मॅरेथॉन बैठकीत झाला अंतिम निर्णय
या सत्तांतराची स्क्रिप्ट दोन दिवसांपूर्वीच दिल्लीत लिहिली गेली होती. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीत कर्नाटकच्या प्रमुख नेत्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. दिल्लीत तब्बल ६ तास चाललेल्या या मॅरेथॉन बैठकीत सिद्धरामय्या यांना पद सोडण्याचे निर्देश देण्यात आले होते.
त्यानंतर आज (२८ मे) सकाळी सिद्धरामय्या यांनी कर्नाटक मधील आपल्या निवासस्थानी सहकाऱ्यांसोबत एक ‘ब्रेकफास्ट बैठक’ घेतली. या बैठकीनंतर त्यांनी अधिकृतपणे पत्रकार परिषद घेऊन आपल्या राजीनाम्याची घोषणा केली.
कर्नाटकात आता ‘डी. के. शिवकुमार’ पर्वाला सुरुवात
सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्यानंतर (CM Siddaramaiah Resignation) आता कर्नाटकमध्ये पूर्णपणे ‘डी. के. शिवकुमार पर्व’ सुरू होणार आहे. लवकरच काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक होऊन त्यात डी. के. शिवकुमार यांची अधिकृतपणे गटनेते म्हणून निवड केली जाईल. त्यानंतर ते राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करतील. त्यांच्या या नव्या इनिंगकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.






