KL Rahul Record : केएल राहुलचा ऐतिहासिक पराक्रम! सेना देशांत अशी कामगिरी करणारा ठरला भारताचा पहिलाच सलामीवीर
KL Rahul Record in Test Cricket : न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी केएल राहुलने आपले अर्धशतक पूर्ण केले. यासोबत त्याने तिन्ही सेना देशांमधील कसोटी सामन्यांमध्ये ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

KL Rahul Record 1st Indian opener to score 50+ runs in all SENA countries in Test : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय सलामीवीर केएल राहुलने एक मोठा इतिहास रचला आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी राहुलने केवळ अर्धशतकी खेळी केली असली, तरी या खेळीमुळे त्याचे नाव क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे. भारताचे दिग्गज माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग यांना आपल्या संपूर्ण कारकिर्दीत सलामीवीर म्हणून जे जमले नाही, ते केएल राहुलने करून दाखवले आहे. दुसऱ्या दिवसाच्या खेळादरम्यान न्यूझीलंडकडे राहुलला बाद करण्याची एक संधी चालून आली होती, मात्र या जीवदानाचा पुरेपूर फायदा घेत राहुलने नंतर मागे वळून पाहिले नाही.
‘सेना’ देशांमध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय सलामीवीर
न्यूझीलंडविरुद्धच्या या अर्धशतकी खेळीसह केएल राहुल ‘सेना’ (SENA) देशांमध्ये जाऊन सर्व संघांविरुद्ध ५० पेक्षा जास्त धावा करणारा पहिला भारतीय सलामीवीर ठरला आहे. ‘सेना’ देशांमध्ये दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांचा समावेश होतो. राहुलने यापूर्वीच ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेत त्यांच्याच भूमीवर शतके झळकावली आहेत. आता चौथा देश असलेल्या न्यूझीलंडविरुद्ध अर्धशतक ठोकून तो नाबाद खेळत आहे.
वीरेंद्र सेहवागलाही जमलं नाही ते करुन दाखवलं –
KL Rahul became the first Indian Test opener to score at least one half-century in all four SENA countries, while moving to second place among Asian openers with 13 fifty-plus scores in SENA Tests during Day 2 of the first Test against New Zealand at the Basin Reserve in Wellington.
Rahul finished unbeaten on 52 off 116 balls, completing his maiden Test fifty in New Zealand.
This knock gave Rahul 13 fifty-plus scores as an opener in SENA Tests, surpassing Sri Lanka’s Dimuth Karunaratne (12) to sit second behind Sunil Gavaskar, who holds the record with 19.
#NZvsIND #KLRahul #WTC27
https://t.co/wI2x5jMLFb
— 🏏Cricket-Soccer⚽ Nostalgiation (@RiteshJ88156274) November 20, 2026
सलामीवीर म्हणून विचार केल्यास वीरेंद्र सेहवागलाही आपल्या कारकिर्दीत अशी कामगिरी करता आली नव्हती. सेहवागने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये कसोटी शतके झळकावली आहेत. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धही एक शतक ठोकले आहे, मात्र त्या सामन्यात तो सलामीला खेळला नव्हता. विशेष म्हणजे, न्यूझीलंडच्या भूमीवर सेहवागला शतक तर दूरच, पण एक अर्धशतकही झळकावता आले नव्हते. त्यामुळे राहुलची ही कामगिरी भारतीय क्रिकेटसाठी अत्यंत खास मानली जात आहे.
सुनील गावस्कर यांच्या विक्रमाच्या अगदी जवळ –
🚨 KL RAHUL’S SENA TEST RECORD! 🇮🇳🔥
– Hundred in Australia ✅
– Hundred in England ✅
– Hundred in South Africa ✅
– Fifty in New Zealand ✅One more milestone awaits!
IT’S TIME TO COMPLETE THE ICONIC SENA HUNDRED CLUB, KL RAHUL! 🤞❤️ https://t.co/vOiAXoF2xF
— Lakshay Sharma (@CricWithLaksh) November 20, 2026
आशियाई कसोटी सलामीवीरांची आकडेवारी पाहिल्यास, केएल राहुलने सेना देशांमध्ये आतापर्यंत १३ वेळा ५० पेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे. या यादीत राहुलने श्रीलंकेच्या दिमुथ करुणारत्नेला मागे टाकले असून, करुणारत्नेने १२ वेळा ही कामगिरी केली होती. आशियाई सलामीवीरांमध्ये राहुलच्या पुढे आता केवळ भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर आहेत. गावस्कर यांनी सेना देशांमध्ये १९ वेळा ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
तिसऱ्या दिवशी शतक झळकावण्याची सुवर्णसंधी –
सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा केएल राहुल ११६ चेंडूत ५ चौकारांच्या मदतीने ५२ धावा करून नाबाद आहे. आता सामन्याच्या तिसऱ्या दिवशी आपले शतक पूर्ण करण्याचा राहुलचा पूर्ण प्रयत्न असेल. जर त्याने उरलेल्या ४८ धावा पूर्ण केल्या, तर सर्व सेना देशांमध्ये कसोटी शतक झळकावणारा तो भारताचा पहिलाच सलामीवीर ठरेल. संपूर्ण क्रिकेट चाहत्यांचे लक्ष आता राहुलच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळीकडे लागले आहे.





