KL Rahul : केएल राहुलचं चमकणार नशीब! कर्णधारपदासह मिळणार २५ कोटी, नेमकं कारण काय? जाणून घ्या

KKR likely to bid Rs 25 crore for KL Rahul IPL 2026 : इंग्लंड दौऱ्यावर शानदार फॉर्मात असलेला सलामीवीर फलंदाज केएल राहुलच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, आयपीएल 2026 मध्ये केएल राहुल दिल्ली कॅपिटल्स सोडून कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघासोबत जोडला जाऊ शकतो. याबाबत चर्चाही सुरू झाली आहे.
केकेआरला नव्या कर्णधाराची गरज –
केकेआरने २०२४ मध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली आयपीएलचे जेतेपद पटकावले होते. मात्र, २०२५ मध्ये त्यांना हा किताब राखता आला नाही. श्रेयस अय्यरला संघाने रिटेन केले नव्हते, त्यानंतर अजिंक्य रहाणेने धुरा स्वीकारली. पण त्याच्या नेतृत्वाखाली संघाची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली. त्यामुळे केकेआर आता नव्या कर्णधाराच्या शोधात आहे आणि यासाठी केएल राहुल हा त्यांचा पहिला पर्याय आहे.
वेंकटेश अय्यरवरचा डाव फसला –
KKR Reportedly Interested in Acquiring KL Rahul from Delhi Capitals via Trade! 😱#KLRahul #IndianCricket #KKR #IPL2025 pic.twitter.com/QlhV6UwY9L
— CRICKETNMORE (@cricketnmore) July 31, 2025
मागील हंगामात केकेआरने मेगा लिलावात अष्टपैलू वेंकटेश अय्यरवर तब्बल २३.७५ कोटी रुपये खर्च केले होते. मात्र, वेंकटेश पूर्णपणे अपयशी ठरला आणि संघाचा हा निर्णय चुकला. दुसरीकडे, केएल राहुलने दिल्ली कॅपिटल्ससाठी १४ कोटीत खेळताना हंगामात ५०० हून अधिक धावा केल्या आणि दिल्लीच्या फ्रेंचायझीला निराश होऊ दिले नाही.
राहुलला कर्णधारपदासह मिळणार २५ कोटी?
आगामी लिलावात केकेआर केएल राहुलसाठी तब्बल 25 कोटी रुपयांची बोली लावू शकते, असे बोलले जात आहे. शिवाय, राहुलला कर्णधारपदाची जबाबदारीही मिळण्याची शक्यता आहे. राहुलकडे आयपीएलमध्ये नेतृत्व करण्याच मोठा अनुभव आहे. याशिवाय, तो सलामीला फलंदाजी, यष्टीरक्षण आणि नेतृत्व अशा तिन्ही आघाड्यांवर सक्षम आहे, ज्यामुळे केकेआरच्या अनेक कमतरता दूर होऊ शकतात. केएल राहुलच्या केकेआरमधील प्रवेशामुळे संघाला एक नवा जोश मिळेल आणि आयपीएल २०२६ मध्ये ते पुन्हा एकदा विजेतेपदासाठी दावेदार ठरू शकतात.





