DC vs GT : केएल राहुलने विराटचा विक्रम मोडत रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

DC vs GT KL Rahul Breaks Virat Kohli’s Record for Fastest 8000 T20 Runs : आयपीएल २०२५ मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या केएल राहुलने एक नवा विक्रम रचला. तो टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद ८००० धावा पूर्ण करणारा भारतीय खेळाडू बनला आहे. याआधी हा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता. विराटने २४३ डावांमध्ये ही कामगिरी केली. पण आता केएल राहुलने २२४ डावांमध्ये ८००० धावा पूर्ण करून विराटचा हा विक्रम मोडला आहे. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात त्याने ही कामगिरी केली. या सामन्यात ३३ धावा करत केएल राहुलने टी-२० स्वरूपात ८००० धावांचा टप्पा गाठला.
या यादीत केएल राहुल पटकावले तिसरे स्थान –
एकूण आकडेवारीबद्दल बोलायचे तर, टी-२० फॉरमॅटमध्ये सर्वात जलद ८००० धावा करण्याचा विक्रम युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने केवळ २१३ डावांमध्ये ही कामगिरी केली. या यादीत पाकिस्तानचा बाबर आझम दुसऱ्या स्थानावर आहे. बाबरने २१८ डावांमध्ये ही कामगिरी केली. आता केएल राहुलचे नाव तिसऱ्या स्थानावर आले आहे, ज्याने २२४ डावांमध्ये हा विक्रम केला. विराट कोहली (२४३ डाव) चौथ्या स्थानावर आहे आणि मोहम्मद रिझवान (२४४ डाव) पाचव्या स्थानावर आहे.
टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद ८००० धावा करणारे फलंदाज:
- ख्रिस गेल – २१३ डाव
- बाबर आझम – २१८ डाव
- केएल राहुल – २२४ डाव
- विराट कोहली – २४३ डाव
- मोहम्मद रिझवान – २४४ डाव
हेही वाचा – DC vs GT : केएल राहुलने झळकावलं ऐतिहासिक शतक! IPL इतिहासात ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू
प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्लीसाठी राहुल सलामीवीर म्हणून मैदानात आला आणि संथ सुरुवातीनंतर त्यांनी धावांचा वेग वाढवला. या फलंदाजाने ३५ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यानंतरही त्याची फलंदाजी थांबली नाही आणि राहुलने डावाच्या १९ व्या षटकात आपले शतक पूर्ण केले. राहुलने ६० व्या चेंडूवर चौकार मारून त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील ५ वे शतक पूर्ण केले. यानंतर राहुलने ६५ चेंडूत १४ चौकार आणि ४ षटकारांसह ११२ धावांची नाबाद खेळी केली. या शतकासह राहुलने ३ वर्षांची प्रतीक्षाही संपवली.
हेही वाचा – RR vs PBKS : बच्चा समझा क्या! अर्शदीपला वैभवशी पंगा घेणं पडलं महागात, तुफान धुलाईचा VIDEO व्हायरल
यापूर्वी, त्याने आयपीएल २०२२ च्या हंगामात लखनौ सुपर जायंट्सचे नेतृत्व करताना २ शतके झळकावली होती. एकूणच, राहुलचे आयपीएल कारकिर्दीतील हे पाचवे शतक आहे. योगायोगाने, शुबमन गिलच्या संघाविरुद्ध शतक झळकावून, राहुलने आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत गिल (४) ला मागे टाकले. राहुल आता या यादीत चौथ्या स्थानावर आला आहे. राहुलच्या पुढे विराट कोहली (८), जोस बटलर (७) आणि ख्रिस गेल (६) आहेत.





