KKR vs RR : रोमांचक सामन्यात कोलकात्याचा राजस्थानवर निसटता विजय, रियान परागचे हुकले शतक

KKR vs RR Kolkata Knight Riders beat Rajasthan Royals by 1 runs : कोलकाता नाईट रायडर्सने रोमांचक सामन्यात राजस्थान रॉयल्सचा एका धावेने पराभव केला. केकेआर आणि राजस्थान यांच्यातील हा सामना खूपच चुरशीचा होता आणि शेवटी, कोलकाताने निसटता विजय मिळवला. अशाप्रकारे, केकेआरने प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. केकेआरने प्रथम फलंदाजी करण्याचा करताना आंद्रे रसेलच्या झंझावाती खेळीच्या जोरावर २० षटकांत ४ गडी गमावून २०६ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल, राजस्थानला कर्णधार रियान परागच्या वादळी खेळीच्या शानदार ८ बाद २०५ धावाच करता आल्या.
रियान परागचे हुकले शतक –
लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात चांगली झाली नाही. कारण संघाने ७१ धावांवर पाच विकेट्स गमावल्या. यानंतर, रियान परागने शिमरॉन हेटमायरसोबत सहाव्या विकेटसाठी ९२ धावांची भागीदारी केली आणि संघाला अडचणीतून वाचवले. यादरम्यान, रियानने मोईन अलीच्या षटकात सलग पाच षटकार मारले. यानंतर २९ धावांवर हेटमायरला बाद करून हर्षित राणाने ही भागीदारी मोडली. यानंतर काही वेळातच त्याने रियानलाही बाद केले. रियान परागला त्याचे शतक पूर्ण करता आले नाही. तो ९५ धावांवर झेलबाद झला.
Another day, another #TATAIPL classic 🤩@KKRiders prevail by 1️⃣ run in a last-ball thriller in Kolkata to boost their playoff hopes 👏💜
Scorecard ▶ https://t.co/wg00ni9CQE#KKRvRR pic.twitter.com/mJxuxBSPqw
— IndianPremierLeague (@IPL) May 4, 2025
कोलकात्याचा राजस्थानवर निसटता विजय –
#RR put on a superb fight 👏
And it all started when their captain Riyan Parag shifted the gears with 6️⃣ sixes in a 𝗥𝗢𝗪!
Watch his brutal hitting ▶ https://t.co/cJgk1XSmEm #TATAIPL | #KKRvRR | @ParagRiyan pic.twitter.com/UCkPjMc0pl
— IndianPremierLeague (@IPL) May 4, 2025
शेवटच्या षटकात राजस्थानला विजयासाठी २२ धावांची आवश्यकता होती आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणून शुभम दुबे आणि जोफ्रा आर्चर क्रीजवर उपस्थित होते. केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेने वैभव अरोराकडे चेंडू सोपवला. आर्चरने पहिल्या चेंडूवर दोन धावा घेतल्या आणि दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली. यानंतर स्ट्राईकवर आलेल्या शुभमने तिसऱ्या चेंडूवर षटकार आणि चौथ्या चेंडूवर चौकार मारला. यानंतर त्याने पाचव्या चेंडूवर षटकार मारला. आता राजस्थानला एका चेंडूवर तीन धावांची आवश्यकता होती. वैभवच्या चेंडूवर शुभमने एक धाव चोरली आणि दुसरी धाव घेण्यासाठी धावला, पण रिंकू सिंगच्या थ्रोवर तो धावबाद झाला. अशाप्रकारे केकेआरने निसटता विजय मिळवला.
हेही वाचा – RCB vs CSK : डेवाल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून जडेजाने पंचांशी घातला वाद, VIDEO होतोय व्हायरल
राजस्थानकडून यशस्वी जैस्वालने ३४ धावा केल्या, तर शुभम दुबेने १४ चेंडूत एक चौकार आणि दोन षटकारांसह २५ धावा केल्या आणि नाबाद राहिला. आर्चर १२ धावा करून बाद झाला. त्याच वेळी, वैभव सूर्यवंशीने चार धावा केल्या आणि कुणाल सिंग राठोड, ध्रुव जुरेल आणि वानिंदू हसरंगा यांना त्यांचे खातेही उघडता आले नाही. केकेआरकडून मोईन, हर्षित आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या, तर वैभवला अरोराला एक विकेट्स मिळाली.





