Srilila : पुष्पा २ सिनेमातील किसिग किसिग या गाण्यामुळे साऊथ अभिनेत्री श्रीलीला हिला मोठी प्रसिद्ध मिळाली. साऊथ सिनेमा इंडस्ट्रीसह तिचा आता देशभरात मोठा चाहतावर्ग आहे. ती अभिनेता कार्तिक आर्यनसोबत एका बॅालिवूड सिनेमात दिसणार आहे. आशिकी ३ असं या सिनेमाचं नाव असून, या सिनेमाच्या टीझरला घेऊन सिनेमाची मोठी चर्चा सुरू आहे. अशातच अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती साऊथ अभिनेता रवी तेजा याच्यासोबत दिसत आहे. रवी तेजासोबत तिने सोशल मीडियावर सेल्फीतला फोटो शेअर केला आहे. हा फोटो तिच्या आगामी मास जठारा या सिनेमाच्या शुटिंगच्या सेटवरील आहे. हा फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांना मोठा आनंद झाला आहे. मास जठार या सिनेमात रवी तेजा आणि डान्सिंग क्वीन श्रीलीला याची जोडी पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. यापूर्वी हे दोघेही धमाका या सिनेमात दिसले होते. हा सुपर अॅक्शन सिनेमा होता. या सिनेमात कॅामेडीचा डोस देण्यात आला आहे. श्रीलीलाने इंस्टाग्रामवर स्वतःचा आणि रवी तेजाचा एक खास सेल्फी फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये श्रीलीला तिच्या देसी साडी लूकमध्ये दिसत आहे आणि रवी तेजा पांढऱ्या टी-शर्टमध्ये दिसत आहे. या खास सेल्फीसोबत श्रीलीलाने एक कॅप्शन दिलं आहे. शेवटी माझा पहिला सेल्फी सर. असं तिने म्हटलं आहे. मास जठार हा सिनेमा २७ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होऊ शकला नाही. यामुळे आता या सिनेमाची नवी रिलीज डेट लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. या सिनेमाचे निर्माते नागा वामसी आहेत. या ॲक्शन-ड्रामा सिनेमाचं दिग्दर्शन भानू भोगावरपू हे करत आहेत. हेही वाचा : विशाल आणि अभिनेत्री साई धनशिकाचा पार पडला साखरपुडा