किरीट सोमय्या प्रकरणाची राज्य महिला आयोगाकडून दखल; रुपाली चाकणकरांनी ट्विट करत दिली महत्वाची माहिती…..

मुंबई – भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ लोकशाही वृत्तवाहिनीवर व्हायरल झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या व्हिडीओमुळे भाजपसह सर्वच पक्षाचे नेते यावर बोलताना दिसत आहे. तर दुसरीकडे किरीट सोमय्या यांनी यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून याविषयीच्या चौकशीची मागणी केली आहे.
दरम्यान, अनेक राजकीय नेत्यांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया व्यक्त करत किरीट सोमय्यांवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. यामध्ये काँग्रेस, ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेससह सर्वच पक्षाच्या नेत्यांनी सोमय्या यांच्यावर शाब्दिक टीका केली आहे. विधिमंडळात देखील आज हाच मुद्दा गाजला असून, विरोधकांनी देखील सभागृहात सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, आता याप्रकरणी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने देखील दखल घेतली असून या संदर्भातील एक पत्रक देखील प्रसारित केलं आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी एक ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. “महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम, १९९३ अंतर्गत कलम १० ( १ ) (फ) (एक) व (दोन) नुसार महाराष्ट्र राज्य महिला आयोगास स्त्रियांच्या तक्रारी विचारार्थ स्विकारणे आधी त्या बाबींची स्वाधिकारे दखल घेणे याकरिता प्राधिकृत करण्यात आले आहे.
भाजप नेते श्री किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ माध्यमांवरून प्रसारित झाला आहे. विविध सामाजिक संस्थाकडून सदर व्हिडिओ बाबत महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयास विचारणा होत आहे.
तरी उपरोक्त प्रकरणी चौकशी करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल(1/2) pic.twitter.com/NKL0nsGjpS— Maharashtra State Commission for Women (@Maha_MahilaAyog) July 18, 2023
भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ माध्यमातून प्रसारीत होत आहे. सदर बाबत विविध सामाजिक संस्थांकडून महाराष्ट्र राज्य महिला आयोगास विचारणा होत आहे. तरी उपरोक्त प्रकरणी चौकशी करुन आपण केलेल्या कार्यवाहीचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल महाराष्ट्र राज्य महिला आयोग कायदा, १९९३ कलम १२ (२) व १२ (३) नुसार तात्काळ सादर करावा.” असं यामध्ये नमूद करण्यात आलं आहे.





