“बाबासाहेबांचे नाव घेऊन जे पाप काँग्रेसने केले ते पुसले जाऊ शकत नाही”; विरोधकांच्या गोंधळावर सत्ताधाऱ्यांची टीका

Kiren Rijiju On Congress । केंद्र सरकारने काल ‘वन नेशन वन इलेक्शन’ विधेयक लोकसभेत मांडले होते. त्यानंतर आता ‘वन नेशन वन इलेक्शन’वर जेपीसी स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी समिती सदस्यांसाठी सर्व पक्षांकडून नावे मागितली आहेत. याविषयी बोलताना त्यांनी, “पीएम मोदींनी बाबा साहेब आंबेडकरांची स्वप्ने पूर्ण करण्याचे काम केले. काँग्रेसने कधीही एससी, एसटी कायदा मंत्री बनवण्याचा विचार केला नाही. बाबासाहेबांचे नाव घेऊन जे पाप काँग्रेसने केले ते पुसले जाऊ शकत नाही.”असे त्यांनी म्हटले.
अमित शहा यांच्या वक्तव्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न Kiren Rijiju On Congress ।
मंगळवारी संसदेच्या अधिवेशनादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप काँग्रेसने केला. अमित शाह यांनी राज्यसभेत दिलेल्या भाषणाबद्दल काँग्रेसने माफी मागण्याची मागणी करत होते, त्यानंतर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. रिजिजू म्हणाले की, “काँग्रेस पक्ष आंबेडकरांच्या नावाचा वापर व्होट बँकेच्या राजकारणासाठी करत आहेत, तर विरोधक राज्यसभेत जय भीमचा नारा देत आहेत.”
#WATCH | In Rajya Sabha, Union Minister Kiren Rijiju says “Yesterday, Union HM Amit Shah clearly showed our sense of reverence in his speech. He also said how Congress insulted Ambedkar ji when he was alive…The Congress party did not award him with Bharat Ratna for so many… pic.twitter.com/0G6MaEG1AN
— ANI (@ANI) December 18, 2024
अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर आज विरोधी पक्षाच्या खासदारांनी ‘जय भीम’च्या घोषणा देऊन गोंधळ घातला, त्यानंतर सभापती जगदीप धनखड यांनी राज्यसभेचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब केले.
बाबासाहेबांचा अपमान सहन करणार नाही Kiren Rijiju On Congress ।
दरम्यान , गृहमंत्री अमित शहा यांच्या विधानाच्या विरोधात संसद भवनाच्या मकर गेटजवळ काँग्रेस आणि इतर अनेक विरोधी पक्षांच्या सदस्यांनी घोषणाबाजी केली. ‘जय भीम’ आणि बाबा साहेबांचा अपमान भारत सहन करणार नाही अशा घोषणा दिल्या. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी, द्रमुक नेते टीआर बालू आणि अनेक विरोधी खासदार बाबासाहेबांचा फोटो घेऊन आंदोलनात सहभागी झाले होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल संसदेत बोलताना, “आजकाल आंबेडकरांचे नाव घेणे ही एक फॅशन बनली आहे.”असे त्यांनी म्हटले. पुढे ते म्हणाले, “आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर… तुम्ही जर एवढ्या वेळा देवाचे नामस्मरण केले असते तर सात जन्म स्वर्गात गेला असता. ही एक फॅशन झाली आहे.” असे वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या भाषणाच्या या भागावरून सध्या देशातील राजकारण तापले आहे.





