पुणे जिल्हा । मलठणच्या उपसरपंच पदी किरण शिंदे यांची बिनविरोध निवड

शिरूर । मलठण गावच्या उपसरपंच पदी शिंदेवाडी येथील ग्रामपंचायत सदस्य किरण देवराम शिंदे यांची (ता १९) ला बिनविरोध निवड झाली आहे. पदावर प्रत्येकाला संधी मिळावी या उद्देशाने माजी उपसरपंच रामभाऊ गायकवाड यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीत शिंदे यांची निवड करण्यात आली.
यावेळी मलठणच्या सरपंच माधुरी थोरात, ग्रामविकास अधिकारी संतोष गायकवाड, माजी सरपंच शशिकला फुलसुंदर, माजी सरपंच सीमाताई माका भाऊ कोळपे, माजी सरपंच अनुसया भगवान कदम, रामचंद्र आनंद गायकवाड, माजी उपसरपंच,माजी उपसरपंच दादासाहेब रामचंद्र गावडे,माजी उपसरपंच सोनाली ताई दीपक दंडवते,माजी सरपंच राणीताई मुकुंद नरवडे,ग्रामपंचायत सदस्य कविताताई मोहन चोरमले, पोपट महाराज साळवे ग्रामपंचायत सदस्य,चेअरमन नाना शिंदे,माजी उपसरपंच दत्तोबा शेठ दंडवते,शाळा समिती अध्यक्ष बाळासाहेब कोळपे,अनिता उत्तम लकडे मा सरपंच सुहास थोरात घोडगंगा साखर कारखाना संचालक,अनिल शिंदे संचालक रावडेवाडी, गुरुदत्त बिरा शिंदे संचालक, मलठण व सर्वच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
किरण शिंदे यांच्या उपसरपंचपदी निवडीनंतर शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे,पराग कारखान्याचे अध्यक्ष यशवर्धन डहाके,माजी सरपंच विलासराव थोरात व मान्यवरांनी शिंदे यांचा सत्कार करीत त्यांना शुभेच्छा दिल्या. तर राज्याचे सहकार मंत्री आमदार दिलीपराव वळसे पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र गावडे,,सुनीता गावडे,डॉ.सुभाष पोकळे,दत्तोबा दंडवते,दीपक रत्नपारखी,बाळासाहेब डांगे,बाजीराव उघडे,विलासराव रोहिले,उत्तम जाधव,किसन हिलाळ व अनेक ग्रामस्थांनी शिंदे यांचे अभिनंदन केले आहे. निवडी नंतर किरण शिंदे यांची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.तर शिंदेवाडीत गुलालाच्या उधळणीसह एकच जल्लोष करण्यात आला.





