Kiran Rao: सोनम वांगचुकांच्या समर्थनार्थ किरण राव मैदानात; सरकारच्या भूमिकेवर साधला थेट निशाणा
Kiran Rao किरण राव यांनी इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्टही शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, "मी सोनम वांगचुक, अभिजीत दिपके, कॉकरोच जनता पार्टी (CJP) आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आंदोलन करणाऱ्या प्रत्येक नागरिकासोबत ठामपणे उभी आहे.

Kiran Rao: सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाला देशभरातून पाठिंबा वाढत आहे. अनेक कलाकार आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनंतर आता चित्रपट निर्माती किरण राव यांनीही उघडपणे सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत केंद्र सरकारने आंदोलनकर्त्यांशी तातडीने संवाद साधावा आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे आवाहन केले आहे. (Kiran Rao)
सोनम वांगचुक यांच्या बेमुदत उपोषणाचा आज 20 वा दिवस आहे. त्यांच्या आंदोलनाला आतापर्यंत विशाल ददलानी, ओमी वैद्य, सोनाक्षी सिन्हा यांच्यासह अनेक कलाकारांनी पाठिंबा दिला आहे. आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी अनेकांनी सोशल मीडियावरील प्रोफाइल फोटो बदलून ‘I Support Sonam’ अशी डीपी ठेवली आहे. किरण राव यांनीही याच मोहिमेत सहभागी होत आपला प्रोफाइल फोटो बदलला. (Kiran Rao)

Kiran Rao
यासोबतच किरण राव यांनी इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्टही शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, “मी सोनम वांगचुक, अभिजीत दिपके, कॉकरोच जनता पार्टी (CJP) आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आंदोलन करणाऱ्या प्रत्येक नागरिकासोबत ठामपणे उभी आहे. सोनमजी, नेहा, मनीष, अमीन आणि या आंदोलनात सहभागी असलेल्या सर्वांना माझा सलाम. न्याय मिळावा म्हणून त्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. त्यांनी आपल्या समाजाला जागे केले असून प्रत्येक आवाज महत्त्वाचा असतो, याची पुन्हा आठवण करून दिली आहे.” (Kiran Rao)
किरण राव यांनी आपल्या पोस्टमध्ये केंद्र सरकारवरही टीका केली. त्यांनी म्हटले की, “इतके दिवस उलटूनही या उपोषणाबाबत सरकारकडून कोणतीही ठोस प्रतिक्रिया आलेली नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. सत्तेत असलेल्या लोकांनी आंदोलनकर्त्यांचे म्हणणे ऐकले पाहिजे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहून त्यांच्याशी संवाद साधणे गरजेचे आहे. शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या नागरिकांचे म्हणणे ऐकणे ही लोकशाहीची जबाबदारी आहे.”
त्यांनी पुढे सरकारला आंदोलनकर्त्यांशी चर्चा सुरू करण्याचे आणि हा तिढा लवकर सोडवण्याचे आवाहन केले. प्रत्येक नागरिकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे आणि त्या अधिकाराचा आदर केला गेला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. (Kiran Rao)
View this post on Instagram
किरण राव यांनी सरकारच्या भूमिकेवर टीका करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 2015 मध्ये त्यांचे तत्कालीन पती आणि अभिनेता आमिर खान यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात किरण राव यांना देशातील वातावरणाबाबत असुरक्षित वाटत असल्याचे सांगितले होते. त्या वक्तव्यामुळे देशभर मोठी चर्चा रंगली होती.
दरम्यान, सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला दिवसेंदिवस अधिक पाठिंबा मिळताना दिसत आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवर, कलाकार आणि सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या समर्थनार्थ पुढे येत असून सरकारने संवादाचा मार्ग स्वीकारावा, अशी मागणी जोर धरत आहे.
किरण राव यांच्या या भूमिकेमुळे सोशल मीडियावरही मोठी चर्चा सुरू झाली आहे. काहींनी त्यांच्या स्पष्ट भूमिकेचे स्वागत केले, तर काहींनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. मात्र, त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर संवाद व्हावा आणि आंदोलनकर्त्यांचे म्हणणे ऐकले जावे, अशी भूमिका स्पष्टपणे मांडली आहे.





