Kiran Mane : गुढीपाडव्याच्या दिवशी किरण मानेंना पितृशोक

मुंबई : आज सगळीकडे गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मात्र या दिवशी मराठमोळे अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज किरण माने (Kiran Mane) यांचे वडील दिनकरराव मारुती माने यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. ते 86 वर्षांचे होते. त्यांनी आपल्या राहत्या घरी, सातारा येथे शेवटचा श्वास घेतला.
किरण माने यांनी स्वतः ही दुर्दैवी बातमी आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे शेअर केली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये मित्र, नातेवाईक आणि चाहत्यांसाठी हा दु:खद संदेश दिला. त्यांच्या पोस्टनंतर चाहत्यांनी आणि कलाकारांनी त्यांना धीर देणाऱ्या अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. आज संध्याकाळी 6 वाजता साताऱ्यातील संगम माहुली येथील कैलास स्मशानभूमीत दिनकरराव माने यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. या दुखद प्रसंगी माने कुटुंबीयांसोबत अनेक चाहते आणि आप्तेष्ट उपस्थित राहणार आहेत.
हे पण वाचा : स्वप्नपूर्ती ! सिद्धार्थ जाधवने आई-वडिलांच्या नावे सुरू केली खास गोष्ट
किरण माने यांच्याबद्दल बोलायचे झाले तर ते मराठी चित्रपट आणि टेलिव्हिजन विश्वातील एक प्रतिभावान आणि संघर्षशील अभिनेते आहेत. ‘मुलगी झाली हो’ या लोकप्रिय मालिकेमुळे ते घराघरात पोहोचले. या मालिकेत “विलास पाटील” ही दमदार भूमिका साकारत त्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. किरण माने हे केवळ अभिनेते नसून त्यांचे लिखाण आणि स्पष्टवक्तेपणा यामुळे ते चर्चेत राहतात. समाजातील विविध विषयांवर ते सोशल मीडियावर रोखठोक मत मांडत असतात.
हे पण वाचा : “सामान्य माणसांनी काय करायचं? राजकीय नेत्यांकडे कसे बंगले…”; शशांक केतकरने व्यक्त केला संताप
‘या’ मालिकांमध्ये केले आहे काम
किरण माने (Kiran Mane) यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ते सध्या ‘लई आवडतेस तू मला’या मालिकेत काम करत आहेत. तसेच त्यांनी याअगोदर ‘माझ्या नवऱ्याची बायको’, ‘पिंपळपान’, ‘भेटी लागी जीवा’, ‘सिंधुताई माझी माई’ आणि ‘तिकळी’ सारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.





