“किंग कोरोना परत आलाय!”, मेघा घाडगेने शेअर केला रुग्णालयातील व्हिडिओ

Megha Ghadge : बिग बॉस फेम अभिनेत्री मेघा घाडगेने (Megha Ghadge) मराठी सिनेमात उत्तम काम केले आहे. अभिनेत्रीसह तिची लावणीसम्राज्ञी म्हणून देखील ओळख आहे. मात्र सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या मेघाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. मेघाने शेअर केलेल्या व्हिडिओत मेघा हॉस्पिटलमध्ये असल्याचे दिसत आहे. मेघाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केलेल्या व्हिडिओत स्वतःच्या आजारपणाचा खुलासा केला आहे. या व्हिडिओनंतर चाहत्यांनी तिच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त केला.
मेघाने शेअर केलेल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले की,”बुखार … !31st येतोय .. किंग करोना परत आलाय please काळजी घ्या, मित्रमैत्रिणींनो 2024ची तुम्हा सर्वांना निरोगी आणि सुख, समृद्धी , भर भरभरून यश मिळो ..!” या कॅप्शनसोबतच तिने हॅशटॅग्समध्ये ‘व्हायरल फिवर’ असे म्हटले आहे. यानंतर अनेकांनी कमेंट करत काळजी घेण्याचा सल्ला तिला दिला आहे. दरम्यान, काही दिवसांपासून मेघावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही दिवसापूर्वीच तिच्या वाढदिवसानिमित्त ती हॉस्पिटलमध्ये केक कापताना दिसली होती.
View this post on Instagram
मेघाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, मेघाने 2022 ला बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनमध्ये सहभाग नोंदवला होता. या सीझनमध्ये मेघाने फायनलपर्यंत मजल मारली नाही तरीही तिच्या खेळाची चर्चा झाली. तसेच मेघाचे अनेक ठिकाणी लावणीचे जाहीर शो महाराष्ट्रात होतानाही दिसतात.





