विद्यापीठाच्या हाॅस्टेलमध्ये 6 फूटी ‘किंग कोब्रा’; पकडतानाचा थरार कॅमेऱ्यात कैद

Updated On:

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शुक्रवारी (दि.२६) मुलांच्या वसतिगृहाजवळ आढळलेल्या ‘किंग कोब्रा’ चे पुनर्वसन विद्यापीठाचे सुरक्षारक्षक सुनील माळी यांनी केले. माळी यांनी या किंग कोब्राला पकडून सुरक्षित ठिकाणी जंगलात सोडले.

शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मुलांचे वसतिगृह क्रमांक ९ येथील केबिनमध्ये नाग आढळल्याचे वसतिगृहातील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेचच ही बाब सुरक्षा विभागाला कळवली.

सुरक्षा विभागातील सुरक्षारक्षक सुनील माळी हे साप व नाग पकडण्यात तरबेज असल्याने ही बाब त्यांना कळवण्यात आली. त्यांनी पुढील वीस ते पंचवीस मिनिटांत त्या नागाला योग्य प्रकारे पडकत सुरक्षित स्थळी सोडले. या किंग कोब्राबद्दल माहिती देताना माळी म्हणाले, हा नाग सहा फुटी असून त्याचे वजन साधारण साडेचार किलो होते.

सुनील माळी यांनी आतापर्यंत २०० हून अधिक साप व नाग पकडले आहेत. दरम्यान माळी यांनी दाखवलेल्या या धडसाबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, सुरक्षा विभागाचे संचालक सुरेश भोसले तसेच सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.

आणखी संबंधित बातम्या

Pune : दादावाला करंडकात लोकनृत्यांचा रंग; 32 शाळा-महाविद्यालयांचा उत्स्फूर्त सहभाग

2026-10-08 19:09:16

Pune : दादावाला करंडकात लोकनृत्यांचा रंग; 32 शाळा-महाविद्यालयांचा उत्स्फूर्त सहभाग

Nana Patekar Funeral: अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

2026-10-08 09:50:15

Nana Patekar Funeral:  अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

FDA: डिटर्जंट, केमिकल वापरून भेसळ ; पुणे विभागात एफडीएकडून दूध संस्‍थांना दणका

2026-10-08 07:48:38

FDA: डिटर्जंट, केमिकल वापरून भेसळ ; पुणे विभागात एफडीएकडून दूध संस्‍थांना दणका

Katraj-Kondhwa: मध्यरात्री पोकलेन-ब्रेकरचा दणदणाट

2026-10-08 07:27:57

Katraj-Kondhwa: मध्यरात्री पोकलेन-ब्रेकरचा दणदणाट

Kharadi: खराडीतील सहामजली इमारत केली जमिनदोस्त; महापालिकेची कारवाई

2026-10-08 07:24:45

Kharadi: खराडीतील सहामजली इमारत केली जमिनदोस्त; महापालिकेची कारवाई