North Korea Kim Jong | व्हेनेझुएलामध्ये शनिवारी पहाटे अमेरिकेने केलेल्या एका भीषण लष्करी कारवाईत राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांची पत्नी सिलिया फ्लोरेस यांना अटक करून थेट अमेरिकेत आणले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः सोशल मीडियावर मादुरो यांच्या अटकेचे छायाचित्रे शेअर करत या मोहिमेची पुष्टी केली. मादुरो राखाडी रंगाचा ट्रॅकसूट घातलेले दिसत असून त्यांचे हात बांधण्यात आले असून त्यांचे डोळेही बांधली आहेत. अमेरिकेच्या या कारवाईमध्ये जगात मोठी खळबळ उडाली. यानंतर आता उत्तर कोरियाचे किम जोंग-उन यांनी मादुरो हे आपले ‘मित्र’ असल्याचं सांगत अमेरिकेला उघडपणे महायुद्धाचा इशारा दिला. अमेरिकेने निकोलस मादुरो यांच्या अटकेनंतर जगाला सध्या काय स्थिती आहे, याची माहिती द्यावी असेही किम जोंग उन यांनी म्हटले. “मादुरो हे आपले मित्र त्यांना तातडीने सोडा” किम जोंग-उन यांनी, “मादुरो हे आपले मित्र आहेत. अमेरिकेचं हे पाऊल जागतिक संघर्षाला जन्म देऊ शकतं. व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांची लगेचच सुटका करण्यात यावी, त्यांना तातडीने सोडा अन्यथा याचे गंभीर आंतरराष्ट्रीय परिणाम होतील,” असा इशारा दिला आहे. North Korea Kim Jong | रशियानेही अमेरिकेच्या या कारवाईचा कडक शब्दांत निषेध केला. रशियन परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन जारी करत, अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या विरोधात सशस्त्र आक्रमकता दाखवली. हे अत्यंत चिंताजनक आणि निंदनीय आहे. अमेरिकेने दिलेले तर्क निराधार आहेत. हे पाऊल मुत्सद्देगिरीऐवजी वैचारिक शत्रुत्वाने प्रेरित आहे.’ North Korea Kim Jong | व्हेनेझुएलामध्ये ‘राष्ट्रीय आणीबाणी’ घोषित दरम्यान, अमेरिकेने व्हेनेझुएलाची राजधानी काराकाससह अनेक ठिकाणांवर भीषण हवाई हल्ले केले. काराकाससह मिरांडा, अरगुआ आणि ला गुइरा या शहरांवर जोरदार बॉम्ब हल्ले करण्यात आले. या हल्ल्यानंतर व्हेनेझुएलामध्ये ‘राष्ट्रीय आणीबाणी’ घोषित करण्यात आली आहे. अमेरिकेचे काय आहेत आरोप? अमेरिकेच्या न्याय विभागाने मादुरो आणि त्यांच्या पत्नी सिलिया फ्लोरेस यांच्यावर गंभीर आरोप ठेवले आहेत. मादुरो हे एका भ्रष्ट आणि अवैध सरकारचे नेतृत्व करत असून, त्यांनी दशकांपासून अमली पदार्थांच्या तस्करीसाठी सरकारी यंत्रणेचा गैरवापर केल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. ‘नार्को-टेररिझम’च्या माध्यमातून अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर कोकेनची तस्करी केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. हेही वाचा: Pune Weather: शहरासह जिल्ह्यात थंडीचा जोर कमी झाला; तापमानात वाढ झाल्याने पारा १२ अंशावर