लहान मुलांना नायकांपेक्षा खलनायक जास्त पसंद

वॉशिंग्टन – सर्वसाधारणपणे समाजात अवतीभोवती घडणाऱ्या घटनांमध्ये जे लोक आदर्श काम करतात त्यांनाच आदर्श मानले जाते पण चित्रपटांमध्ये किंवा टीव्हीवर जे खलनायकाचे पात्र रंगवतात त्या खलनायकांना मात्र लहान मुले अधिक पसंद करत असल्याचे समोर आले आहे कोणताही चित्रपट असो किंवा वेब सिरीज असो किंवा टीव्हीवरील मालिका असो त्यावरील नायकापेक्षाही खलनायकालाच लहान मुले पसंत करत असल्याचा निष्कर्ष अमेरिकेतील विद्यापीठात झालेल्या संशोधनानंतर समोर आला आहे.
युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगनने चार ते बारा वयोगटातील 450 मुले आणि 277 प्रौढांवर संशोधन केले एखाद्या मालिकेत किंवा चित्रपटात दाखवण्यात येणारा खलनायक कितीही घमंडी भ्रष्टाचारी आणि अत्याचारी असला तरी अनेक मुलांना तो आदर्श वाटतो अशी धक्कादायक बाब समोर आली खलनायक परिस्थितीमुळे खलनायक बनतात असेही या मुलांना वाटते एवढेच नाही तर या खलनायकासारखे जीवन जगण्याची मनीषा सुद्धा अनेकांनी या संशोधनामध्ये व्यक्त केली आहे छोट्या किंवा मोठ्या पडद्यावर खलनायक साकारणारे पात्र नेहमीच आपल्या सहकाऱ्यांवर प्रेम करत असते.
किंवा पाळीव प्राण्यांवरही प्रेम करत असते अशा प्रकारची दृश्य दाखवली जातात त्याचाही परिणाम या लहान मुलांच्या मनावर होतो हे खलनायक सर्वांवर प्रेम करतात असा ते त्याचा अर्थ घेतात नुकत्याच करण्यात आलेल्या अन्य एका संशोधनामध्ये खलनायकांना आदर्श मानणारे व्यक्ती तीन प्रकारे कार्यरत होऊ शकतात पहिल्या प्रकारातील लोक पुढे जाऊन अशी खलनायकी वृत्ती जोपासू शकतात आणि वाईट कामे करू शकतात दुसऱ्या प्रकारातील लोक कपटी जीवन जगतात आणि लोकांची फसवणूक करणे हेच त्यांचे ध्येय बनू शकते तिसऱ्या प्रकारातील लोक हे अतिशय रागीट असू शकतात.
आणि प्रसंगी ते टोकाची हिंसा करू शकतात खलनायकाला आदर्श मानणारे लोक रागावर नियंत्रण ठेवू शकत नसल्याने अशा लोकांचे मानसिक समुपदेशन करण्याची गरज असल्याचेही या अहवालात म्हटले आहे संशोधनातील आणखीन एक उल्लेखनीय बाब म्हणजे महिलांच्या तुलनेत पुरुषांना खलनायक जास्त आदर्श वाटतात महिला मात्र खलनायकांचा तिरस्कारच करतात गेल्या काही वर्षांमध्ये जागतिक पातळीवरील चित्रपटसृष्टी मध्ये कथानकात बदल झाला असून पण नायक हाच खलनायकासारखा वागत असल्याने त्याचाही परिणाम लहान मुलांच्या मनावर होऊ लागला आहे.





