Nagar | गर्लफ्रेंडला महागड्या भेटवस्तू देण्यासाठी प्रवाशांचे अपहरण

नगर, (प्रतिनिधी) – कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत तसेच पुणे बस स्टॅण्ड परिसरात मौज मज्जा करण्यासाठी तसेच गर्लफेंडला महागड्या भेटवस्तू देण्यासाठी प्रवाशांचे अपहरण करूण त्यांना मारहाण करून लुटणारे संशयीत आरोपी कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यातील एक आरोपी पसार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहे.
बबल्या ऊर्फ अनिकेत शंकर वाकळे (वय २३, रा. काटवण खंडोबा, महात्मा फुले वसाहत) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याकडे चौकशी केली असता त्याचा साथीदार सुरज ऊर्फ राजु केदारे (रा. बोल्हेगांव अ नगर) हा पसार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहे. त्याच्याकडे चौकशी केली असता गर्लफ्रेंडला भेट वस्तू व मौज मज्जा करण्यासाठी तपासात पुढे आले आहे.
याबाबत माहिती अशी की, रविवार (दि. १४) रोजी रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी आनिल गोरख हाडे (वय २९. रा. मैदा ता.जि.बीड) हे अहमदनगर येथून पुणे बस स्टॅण्ड येथे बीडकडे जाणारे गाडीची बस स्टॅण्ड बाहेरील रोडवर वाट पहात आसताना काळ्या रंगाचे दुचाकीवर दोन अनोळखीनी त्यांना बळजबरीने दुचाकीवर बसवुन आर्मी परिसरात नेऊन त्यांना बेदम मारहाण करून पैसे घेतले. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घटनेचा तपास करत असता पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळालेली माहिती अशी की हा गुन्हा वाकळे याने त्याच्या साथीदारासह केला आहे. व तो सध्या काटवण खंडोबा परिसरात आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसारपो.नि. दराडे यांनी पथकास आरोपीस ताब्यात घेण्याच्या सूचना केल्या.
मिळालेल्या माहितीनुसार पथकाने काटवन खंडोबा परिसरात सापळा रचवून आरोपीस ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस योगश भिंगारदिवे, गणेश धोत्रे, अविनाश वाकचौरे, सलीम शेख, अभय कदम, अमोल गाडे, सतिष शिंदे, अतुल काजळे, सोमनाथ राऊत, मोबाईल सेलचे राहुल गुंडु यांच्या पथकाने केली.





